पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी वाढवून देण्यात आलेली शेवटची तारीख अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळेच ३० जून २०२० पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक न करणाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते.

आयकर विभागाने जारी केलेल्या नव्या सूनचेनुसार ज्या व्यक्तींनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलं नसेल त्यांना पॅन कार्ड वापरताना अडचणी निर्माण होऊ शकतील. आधार कार्डशी लिंक नसणारे पॅन कार्ड हे निष्क्रिय म्हणजेच रद्द केल्याप्रमाणे असतील असंही आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे.

अवश्य वाचा : (पॅन-आधार लिंक करण्याची स्टेप-बाय-स्पेट सोपी प्रक्रिया)

पॅनकार्ड निष्क्रिय झाल्यास कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. आयकर विभागाच्या नियमांनुसार मोठे आर्थिक व्यवहार करताना पॅन कार्ड क्रमांक देणे बंधनकारक आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक न करता आयकर विवरण भरता येण्याची भूभा देण्यात आली आहे. मात्र आय़कर विवरणाचा अर्ज भरला असला तरी जोपर्यंत पॅन आणि आधार लिंक केले जात नाही तोपर्यंत तो अर्ज आयकर खात्याकडून विचाराधीन घेतला जाणार नाही.

३० जूनपर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नाही तर १ जुलैपासून पॅन कार्डचा काहीच उपयोग करता येणार नाही. पॅनकार्ड असून नसल्यासारखेच होईल. तसेच नवी नियमांनुसार पॅन कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. मात्र पुन्हा पॅन कार्ड काढताना तुम्हा आधार कार्ड दाखवणे बंधनकारक असणार आहे. त्यावेळी जर तुम्ही आधार कार्ड असूनही ते लिंक केलं नसल्याचा खुलासा झाल्यास पॅन कार्डधारकाकडून १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. आयकर विभागाच्या नियमांनुसार सेक्शन २७२ बी अंतर्गत हा दंड आकरण्यात येऊ शकतो.

पॅन कार्ड वापरुन आधी केलेले सर्व व्यवहार ग्राह्य धरले जातील. नवीन पॅन कार्ड काढल्यानंतर ठराविक कालमर्यादेमध्ये तुम्ही आधार आणि पॅन लिंक केल्यास तुमचे पॅन कार्ड पुन्हा सक्रीय होईल. जर तुम्ही आयकर परताव्यासाठी अर्ज केला नसेल तर अशा प्रकरणामध्ये तुम्हाला कालमर्यादा ओलांडून गेल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज दाखल करता येणार नाही. आयकर विभागाच्या वेबसाईटवर पॅन आणि आधार लिंक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

अनिवासी भारतीयांना (एनआरआय) पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक नाही. मात्र काही आर्थिक व्यवहारांसाठी एनआरआय व्यक्तींकडे आधार कार्डची विचारणा केली जाऊ शकतो. अनिवासी भारतीय व्यक्तींना आधार कार्डसाठी अर्ज करता येतो.