धातू उत्पादनातील अग्रेसर कंपनी हिंदुस्तान झिंकमधील उर्वरित सरकारी हिस्सा तिची सध्याची पालक कंपनी सेसा स्टरलाइटला विकण्याला केंद्र सरकारने काल मंजुरी दिली. परिणामी मंगळवारी सकाळी बाजार उघडताच हा समभाग ७ टक्क्य़ांनी उसळून १४१.८० वर पोहचला होता.
अंक माहात्म्य ६६ वे स्थान
*आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राच्या यादीत समाविष्ट  मुंबई शहराची क्रमवारी.
* जागतिक वित्तीय केंद्र निर्देशांकानुसार मुंबई तीन पायऱ्यांनी खालावली आहे. या यादीत भारतातील एकमेव शहर असलेले मुंबई गेल्या वर्षी ६३ क्रमांकावर होते.
“आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राच्या यादीत वरचे स्थान मिळण्यासाठी मुंबई शहर पात्र असून जागतिक आर्थिक परिषदेच्या व्यासपीठावर याबाबतच्या मागणीला पाठिंबा मिळायला हवा. जागतिक दर्जाचे वित्तकेंद्र म्हणून मुंबईला विकसित करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहेत.”
राणा कपूर, ‘असोचेम’चे अध्यक्ष
(मुंबईला आंतरराष्ट्रीय वित्तकेंद्राचा दर्जा देण्याबाबत)