बोलणाऱ्याची बोरे देखील विकली जातात पण न बोलणाऱ्याची सफरचंदेही विकली जात नाहीत, अशी म्हण आहे. त्या न्यायाने एखाद्या कंपनीचे प्रवर्तक जास्त जाहिरातबाजी करीत असतील तर तिथे सावधपणा दाखवावा! टीव्ही वाहिन्यांवर चमकेगिरी करणारे, वृत्तपत्रात वारंवार छबी झळकवण्याची व्यवस्था करणारे, कंपनीच्या एकूण आíथक स्थितीचा विचार न करता स्वतला गलेलठ्ठ वेतन घेणारे जर प्रवर्तक असतील अशा कंपन्या शक्यतो गुंतवणुकीसाठी टाळाव्यात..
शेअर बाजारात अभ्यास करून गुंतवणूक करावी असे सर्वच सांगतात. पण त्यासाठी अनेक वेबसाइटवर तयार माहिती उपलब्ध असते. उदाहरणार्थ कोणत्या कंपनीने गेल्या सहा महिन्यात किंवा एक वर्षांत कशा प्रकारे कामगिरी केली आहे आणि त्या शेअर्समध्ये पसे गुंतवून किती परतावा मिळाला आहे याची माहिती http://www.moneysukh.com  या साइटवर उपलब्ध आहे. विजय रांजणे यांनी ही माहिती देताना ज्या मालाला खप जास्त त्या कंपनीचा फायदा जास्त असणार असे सांगताना आजकाल चहापेक्षा लोक दारू जास्त पितात त्यामुळे त्या मालाला जास्त मागणी आहे, असे सोदाहरण दाखवून दिले. वॉरन बफे तरी दुसरे काय सांगतात? अर्थात एखाद्या कंपनीच्या शेअरचा भाव सहा महिन्यात तिप्पट झाला म्हणजे पुढील तीन महिन्यात तो तसाच होईल असे नाही, हे पण लक्षात ठेवावे. गेल्या आठवडय़ात नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलच्या डॉ. मुंजे इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयातर्फे आयोजित दोन दिवसांच्या कार्यशाळेत भांडवली बाजारातील तज्ज्ञ वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, निवृत्त अशा सर्व स्तरातील व्यक्तींसाठी सुवर्णसंधीच म्हणता येईल.
ट्रेिडग खाते उघडल्यावर किंवा व्यवहार केल्यावर एसएमएस येत नाही असे काहीजण सांगतात. त्याचे कारण ट्रेडिंग खाते उघडताना आपला मोबाईल क्रमांक दिलेला नसतो. कोणती कंपनी निवडावी, कोणती निवडू नये, कंपनीचा वार्षकि अहवाल कसा पाहावा या विषयी प्रसिद्ध इक्विटी अ‍ॅनालिस्ट नितीन खंडकर यांचे विवेचन तर अप्रतिम होते. FMCG (Fast Moving Consumer Goods)  म्हणजे चटकन विकली जाणारी ग्राहकोपयोगी उत्पादने जी साधारणपणे कमी किंमतीची असतात अशा कंपनीचे शेअर्स प्राधान्याने घ्यावे असा खंडकर यांचा सल्ला आहे. ज्या मालाचा ब्रँड प्रस्थापित झाला आहे त्या शेअर्सना अग्रक्रम द्यावा कारण विक्री/खप हा त्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय नसतो. वर्धिष्णु मागणी असलेल्या या उत्पादनांमध्ये चार चाकी वाहने, सीमेंट वगरेचाही अंतर्भाव असावा. ज्या कंपनीवर किंवा उत्पादनावर सरकारची जास्तीत जास्त नियंत्रणे आहेत अशा कंपन्या शक्यतो टाळाव्यात, असा सल्लाही काही वक्त्यांनी दिला. स्वच्छ, समर्थ आणि  नतिकता मानणारे व्यवस्थापन ज्या कंपनीत आहे त्यांचे भवितव्य नक्कीच चांगले असते असा सूर व्यक्त केला गेला. अशा कंपनीचे व्यवस्थापन मंडळ येणाऱ्या संभाव्य अडचणीना तोंड देण्यास सक्षम असते. Return on Equity  आणि Return on capital employed यथातथा असेल त्या कंपनीच्या वाटेला जाऊ नये. कागदावरील फायद्यापेक्षा प्रत्यक्ष फायद्यातून देण्यात येणारा कर आणि लाभांश हेच खरे असतात. वरचेवर भांडवल कमी करणाऱ्या कंपनीबाबत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असते अर्थात बोनस शेअर्स देताना ते कमी झाले असेल तर तो अपवाद समजावा. ज्या कंपनीच्या प्रवर्तकांनी आपल्याकडील भरपूर संख्येने शेअर्स कर्जासाठी तारण म्हणून ठेवले असतील (Pledge)  तिथे काहीतरी पाणी मुरते आहे असे मानण्यास जागा असते.
बोलणाऱ्याची बोरे देखील विकली जातात पण न बोलणाऱ्याची सफरचंदेही विकली जात नाहीत, अशी म्हण आहे. त्या न्यायाने एखाद्या कंपनीचे प्रवर्तक जास्त जाहिरातबाजी करीत असतील तर तिथे सावधपणा दाखवावा! एखाद्या कंपनीतील वरिष्ठ पदावरील अधिकारी वारंवार कंपनी सोडून जात असतील, प्रवर्तक वारंवार टीव्ही वाहिन्यांवर चमकेगिरी करीत असतीत, वृत्तपत्रात वारंवार छबी झळकवण्याची व्यवस्था करीत असतील, कंपनीच्या एकूण आíथक स्थितीचा विचार न करता स्वतला गलेलठ्ठ वेतन घेत असतील, आपल्याच गोतावळय़ातील माणसांना अधिकार पदावर नेमत असतील, प्राप्तिकर खात्याकडून छापे पडणे वगरे सर्व बाबी धोक्याची घंटा वाजवीत असतात. अर्थात या सर्व बाबी जाणून घेण्यासाठी नियमित वाचन असणे आवश्यक आहे.
प्रसिद्ध अर्थतज्ञ विनायक गोविलकर यांनी करुणानिधी यांच्या द्रमुकने केंद्र सरकारचा पािठबा काढून घेतला ही बातमी जितकी महत्वाची आहे तितकीच महत्वाची बातमी त्यांच्या पुत्रावर सीबीआयने छापे घातले ही आहे असे सांगत सखोल वाचन किती आवश्यक आहे याचे प्रतिपादन केले. कंपनीचा वार्षकि अहवाल कसा वाचावा, त्यात काय पाहावे वगरे बाबी सविस्तर सांगत नितीन खंडकर यानी श्रोत्यांवर अक्षरश गारूड केले. या प्रकारच्या कार्यशाळा खूप उपयुक्त आणि आवश्यक आहेत या दृष्टीने इतर महाविद्यालये यांनी पुढाकार घेऊन आपणही असे कार्यक्रम आयोजित केले तर आíथक साक्षरता फार दूर नसेल हे नक्की.