पुणे : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीला वर्षअखेरीस १४.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाल्याचे मंगळवारी पुणे येथे झालेल्या सोसायटीच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आले. सभेत वार्षिक आढावा मांडताना लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी ही घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकमान्य’चे मुख्य कार्यालय बेळगाव येथून पुणे, महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतरची ही पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा होती. त्यामुळे या सभेला एक वेगळे महत्त्व होते. संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर हे सभेच्या अध्यक्षस्थानी, तर सभेसाठी व्यासपीठावर उपाध्यक्ष अजित गरगट्टी, प्रसाद ठाकूर, गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, प्रभाकर पाटकर, सई ठाकुर-बिजलानी आदी संचालक मंडळी तसेच मुख्य वित्तीय अधिकारी वीरसिंग भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित दीक्षित, पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव व ठेवीदार-सभासद लक्षणीय संख्येने उपस्थित होते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profit lokmanya society lokmanya multipurpose co op profit ysh
First published on: 30-09-2022 at 00:02 IST