मुंबई : आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये बँका आणि वित्तीय संस्थांनी प्रकल्पांसाठी मंजूर केलेल्या अर्थसाहाय्यात राजस्थानचा वाटा सर्वाधिक आहे. सलग दुसऱ्या वर्षांत राजस्थान आघाडीवर आहे. राजस्थानपाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. रिझव्‍‌र्ह बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या टिपणांने हे स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यनिहाय आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये निम्म्याहून अधिक म्हणजेच ५६.४ टक्के प्रकल्प हाती घेण्यात आले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘खासगी उद्योगांची गुंतवणूक : २०२१-२२ मधील वाढ आणि २०२२-२३ साठी अपेक्षा’ असा मथळा असलेल्या टिपणाने हे म्हटले आहे. नवीन प्रकल्प गुंतवणुकीत या पाच राज्यांचा वाटा २०१२-१३ ते २०१९-२० या कालावधीत सरासरी ४०.७ टक्क्यांवरून, गेल्या दोन वर्षांत ५० टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan leads new private project investment reserve bank ysh
First published on: 20-08-2022 at 00:02 IST