मुंबई : आर्थिक डबघाईला आलेल्या आणि एप्रिल २०१८ पासून रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध लादलेल्या सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेवरील ‘कलम ३५ अ’खालील निर्बंधांना रिझव्‍‌र्ह बँकेने आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली.

ताज्या आदेशाप्रमाणे, १६ जानेवारी २०२३ पर्यंत बँकेवरील निर्बंध कायम राहतील. अर्थात ही मुदतवाढ म्हणजे बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत मध्यवर्ती बँकेचे समाधान झाले असल्याचे समजले जाऊ नये, असे रिझव्‍‌र्ह बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले आहे.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
Scheme for women Assemblies Candidates for women Prime Minister Narendra Modi
पहिली बाजू: महिला सशक्तीकरणाची नवी पहाट
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर

मात्र सिटी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी धनवर्षां समूहाकडून २३० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सुरू असलेल्या प्रयत्नांच्या दृष्टीने हा मोठा दिलासा आहे, असे बँकेचे अध्यक्ष माजी खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले. सरलेल्या तिमाहीत बुडीत कर्जाची वसुली चांगली सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.