बरोबर एक वर्षांपूर्वी एप्रिल २०१५ मध्ये बाजारात आलेल्या ट्रॅनक्विनी या शहरी वेगवान जीवशैलीत चैतन्य व निवांतता प्रदान करणाऱ्या जागतिक शीतपेय ब्रँडने भारतीय बाजारात प्रवेशाची गुरुवारी घोषणा केली.
कंपनीचे संस्थापक अहमद इलाफिफी यांनी गुरुवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत, अल्पावधीत जगाच्या तीन खंडांत २४व्या देशात विस्तारासह, भारतात स्थानिक स्तरावर उत्पादन घेण्याचाही विचार असल्याचे सांगितले.
‘प्रीमियम’ श्रेणीतील रेड बुल व तत्सम पेयाशी स्पर्धा करणाऱ्या ट्रॅनक्विनीचे दोन प्रकार – फळांची उत्साहवर्धक चव असलेले ‘ट्रॅनक्विनी ओरिजनल’ आणि अभिनव ग्रीन टीचा समावेश असलेले ‘ट्रॅनक्विनी जेड’ ३०० मिली कॅनमध्ये ९५ रुपये किमतीत निवडक ठिकाणी उपलब्ध झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2016 रोजी प्रकाशित
ट्रॅनक्विनीचा भारतात प्रवेश; ऑस्ट्रियन पेय निर्मात्यांचा स्थानिक उत्पादनावरही भर
‘प्रीमियम’ श्रेणीतील रेड बुल व तत्सम पेयाशी स्पर्धा करणाऱ्या ट्रॅनक्विनीचे दोन प्रकार
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 13-05-2016 at 12:28 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relaxation drinks maker tranquini enters india