नवी दिल्ली :  ‘सहकार भारती’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत सहकारी अर्थचळवळीचे प्रणेते, जनकल्याण आणि युनायटेड वेस्टर्न बँक आदींचे माजी अध्यक्ष सतीश मराठे यांची मंगळवारी केंद्र सरकारने रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती केली. स्वदेशी जागरण मंचचे नेते आणि संघाशी संबंधित अर्थतज्ज्ञ एस. गुरुमूर्ती यांचीही रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मंगळवारी रात्री घेतलेल्या विशेष बैठकीत या दोन्ही नियुक्त्यांना मंजुरी दिली. सहकारी बँकांसमोरील आव्हाने आणि अडचणी रिझव्‍‌र्ह बँकेसमोर मांडून त्या धसास लावणे हे आपले उद्दिष्ट असेल, असे मराठे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले