विआन इंडस्ट्रिजविरुद्ध कारवाई

मुंबई : पॉर्न फिल्म प्रकरणातील राज कुंद्रा व पत्नी- अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना सेबीने बुधवारी दंड ठोठावला. उभयतांच्या विआन इंडस्ट्रीजवर समभाग गैरव्यवहारप्रकरणी कारवाई करताना भांडवली बाजार नियामकाने ३ लाख रुपये भरण्याचा आदेश जारी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदुस्थान सेफ्टी ग्लास इंडस्ट्रीज म्हणून ओळखले जाणाऱ्या विआन इंडस्ट्रीजचे राज व शिल्पा प्रवर्तक आहेत. १० कोटी रुपयांचे बाजार भांडवल असणारी विआन इंडस्ट्रीज भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपनी आहे.

राज ऊर्फ रिपू सुदन कुंद्रा व शिल्पा शेट्टी कुंद्रा संचालक असलेल्या विआन इंडस्ट्रीजची सप्टेंबर २०१३ ते डिसेंबर २०१५ दरम्यान करण्यात आलेल्या चौकशीवर आधारित ही कारवाई करण्यात आली आहे.

ऑक्टोबर २०१५ मध्ये विआन इंडस्ट्रीजने २.५७ कोटी रुपयांचे ५ लाख समभाग कुंद्रा दाम्पत्यासह चार जणांना जारी केले होते. मात्र याबाबतच्या कायदेशीर नियमांचे पालन झाले नसल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. याबाबत नियामकाला कळवले नसल्याचेही सेबीने बुधवारी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi fines raj kundra shilpa shetty ssh
First published on: 29-07-2021 at 02:38 IST