अमेरिकेच्या लसविषयक निर्णयाने उत्साह

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : जागतिक स्तरावर प्रमुख भांडवली बाजारांमधील तेजीने मिळवून दिलेल्या उत्साहातून, वाहन, वित्तीय सेवा तसेच माहिती-तंत्रज्ञान समभागांमध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या मुख्य निर्देशांकांमध्ये गुरुवारी सलग दुसऱ्या सत्रात सकारात्मक वाढ दिसून आली.

अमेरिकी सरकारने करोना प्रतिबंधक लशींसाठी बौद्धिक संपदा हक्कातून सूट देण्याच्या घेतलेल्या निर्णयाने भांडवली बाजारातील सहभागींनाही उत्तेजन देण्याचे काम केले. या निर्णयामुळे भारतासह अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये लसीकरण मोहिमेला आणखी गती मिळू शकेल, या विश्वासाने बाजारात खरेदीचा उत्साहही दुणावल्याचे गुरुवारी दिसून आले. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स २७२.२१ अंशांची भर घालून ४८,९४९.७६ या पातळीवर पोहचला. बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकानेही १०६.९५ अंशांची कमाई करीत, १४,७२४.८० या स्तरावर दिवसाच्या व्यवहारांना निरोप दिला.

सेन्सेक्समधील ३० पैकी १० समभागांनी गुरुवारच्या तेजीत चांगली कमाई केली. बजाज ऑटो, एचडीएफसी, टेक महिंद्र, इन्फोसिस, नेस्ले इंडिया, मारुती आणि टायटन हे समभाग अडीच टक्क्यांपर्यंत वधारले. त्या उलट पॉवरग्रिड, ओएनजीसी, एशियन पेंट्स, बजाज फिनसव्र्ह, इंडसइंड बँक, एनटीपीसी आणि सन फार्मा हे समभाग घसरणीत राहिले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second consecutive index increase akp
First published on: 07-05-2021 at 00:09 IST