प्रमुख निर्देशांकावर सलग दुसऱ्या दिवशी घसरणछाया; मिडकॅप, स्मॉल कॅप निर्देशांकांची मात्र मुसंडी
चिनी भांडवली बाजारातील पडझडीचे बाजारावर सावट असताना, त्यापेक्षा गहन अमेरिकेच्याही घसरत्या औद्योगिक उत्पादनाबाबतची चिंता बाजारात मंगळवारी उमटली. परिणामी येथील प्रमुख निर्देशांकावर सलग दुसऱ्या दिवशी घसरणछाया कायम राहिली. मात्र ४३.०१ अंश घसरणीसह मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५,५८०.३४ वर तर ६.६५ अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७,७८४.६५ पर्यंत आला. सत्रात काहीशी तेजी नोंदविणारे प्रमुख निर्देशांक दिवसअखेर मात्र पंधरवडय़ाच्या नव्या तळात विसावले.
आर्थिक मंदीमुळे चिनी बाजारातील ७ टक्क्य़ांपर्यंतच्या आशियाई निर्देशांक पडझडीनंतर सेन्सेक्सने सोमवारी २०१६ मधील पहिल्या काळ्या सोमवारची नोंद केली होती. ५०० हून अधिक अंश घसरणीमुळे सेन्सेक्स तर जवळपास २०० अंश आपटीमुळे निफ्टीने सप्टेंबरनंतरची सत्रातील मोठी नोंदविली होती.
सोमवारचा प्रवास चीनमधील अर्थमंदीवर झाला. तर मंगळवारच्या निर्देशांक घसरणीला अमेरिकेच्या घसरत्या औद्योगिक उत्पादन दराचे निमित्त मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारात चीनमधील प्रमुख निर्देशांकांबरोबरच अमेरिका, युरोपमधील प्रमुख निर्देशांकांमध्येही घसरण होती.
सोमवारच्या मोठय़ा पडझडीनंतर २५,७४४.७० अशा वाढीव स्तरावर सुरू झालेला सेन्सेक्स व्यवहारात २५,७६६.७६ वर पोहोचला. तर निफ्टीनेही सत्रात ७,८३१.२० पर्यंत झेप घेतली. दिवसअखेर मात्र निर्देशांकांना तेजी राखता आली नाही. परिणामी १८ डिसेंबरनंतरच्या किमान स्तरावर निर्देशांक पोहोचले. दिवसअखेरचा त्यांचा हा गेल्या पंधरवडय़ाचा तळ होता.
येथील बाजारात दुपापर्यंत तेजी असताना स्थावर मालमत्ता, ऊर्जा व वायू क्षेत्रातील समभागांकरिता मागणी नोंदली गेली. मात्र येत्या आठवडय़ापासून जाहीर होणाऱ्या कंपन्यांच्या वित्तीय निष्कर्षांची चिंताही बाजारात दिवसअखेर घसरणीच्या रुपाने जाणवली.
सेन्सेक्समधील कोल इंडिया, सर्वाधिक, १.३५ टक्क्य़ासह घसरणीत आघाडीवर राहिला. तर स्टेट बँक, हीरो मोटोकॉर्प, हिंदुस्थान यूनिलिव्हर, टीसीएस, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, ल्युपिनच्या समभागाचे मूल्यही रोडावले. टाटा स्टील, गेल, एशियन पेंट्स, ओएनजीसी, रिलायन्स, भेल, आयसीआयसीआय बँक यांच्या मूल्यवाढ दिसली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Sensex ends 43 points down nifty 50 settles at
First published on: 06-01-2016 at 06:40 IST