सेन्सेक्स, निफ्टीत किरकोळ घसरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटनच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या संभाव्य निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या येथील गुंतवणूकदारांनी भांडवली बाजाराला पुन्हा किरकोळ घसरणीचीच नोंद करण्यास भाग पाडले. ४७.१३ अंश घसरणीसह सेन्सेक्स २६,७६५.६५ वर तर १६.२० अंश घसरणीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,२०३.७० पर्यंत थांबला.
गेल्या काही सत्रांपासून भांडवली बाजाराचे व्यवहार आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अधिक प्रतिक्रिया देत आहेत. युरो झोनमध्ये राहण्याच्या ब्रिटनच्या निर्णयाचा निकाल गुरुवारी स्पष्ट होणार असल्याने मुंबई शेअर बाजारात बुधवारी फारसे व्यवहार झाले नाहीत. त्यातही सत्रात २६,८८७ या वरच्या टप्प्यावर पोहोचलेल्या मुंबई निर्देशांकात व्यवहारात २६,६१७.४५ चा तळही अनुभवला गेला. दिवसाची अखेरही मंगळवारप्रमाणेच किरकोळ घसरणीने झाली.
मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.६० व ०.१२ टक्क्याने घसरले. सेन्सेक्समधील १२ समभागांचे मूल्य रोडावले. तर वाहन, दूरसंचार आदी ०.७९ टक्क्यांपर्यंत घसरले. तर मध्यल्या सत्रातील तेजीमुळे आरोग्य निगा, स्थावर मालमत्ता, पोलाद आदी निर्देशांक सत्रअखेरही ०.४२ टक्क्यांपर्यंत वाढले.

‘ब्रेग्झिट’ चिंतेने घसरण!
६ टाटा मोटर्स रु. ४७२.५० ३ २.५८%
६ भारत फोर्ज रु. ७३७.७५ ३ २.३९%
६ हिंदाल्को रु. १२२.०० ३ १.०१%
६ टेक महिंद्र रु. ५३२.२० ३ ०.९४%
६ इन्फोसिस रु. १,१९८.५५ ३ ०.६१
६ टाटा स्टील रु. ३३२ ३ ०.५५%

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex ends lower for second day on brexit worries
First published on: 23-06-2016 at 07:45 IST