मुंबई : जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेत आणि देशांतर्गत पातळीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केल्याने गेल्या आठवडय़ातील तेजीला सोमवारी लगाम बसला. दिवसअखेर सेन्सेक्स ८६.६१ अंशांच्या घसरणीसह ५४,३९५.२३ पातळीवर बंद झाला. तर  निफ्टीमध्ये ४.६० अंशांची नगण्य घसरण होत तो १६,२१६ पातळीवर स्थिरावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशांतर्गत बाजारात गुंतवणूकदारांनी कंपन्यांच्या तिमाही कामगिरीकडे लक्ष केंद्रित केले आहे. सरलेल्या तिमाहीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमकुवत राहण्याच्या शक्यतेने सोमवारच्या सत्रात  माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात घसरण झाली. दुसरीकडे बँकिंग, धातू आणि ऊर्जा समभागांमधील तेजीने मात्र बाजारातील पडझड मर्यादित राहिली. जून महिन्यातील महागाई दरासंबंधी आकडेवारी चालू आठवडय़ात प्रसिद्ध होणार आहे. ती मे महिन्यातील ७.०४ टक्क्यांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, बुधवारी अमेरिकेतील महागाई दराची आकडेवारी जाहीर होणार असून मे महिन्यातील ८.६ टक्क्यांच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex falls 87 points global negative signals ysh
First published on: 12-07-2022 at 00:02 IST