भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सप्ताहारंभी पुन्हा एकदा नव्या विक्रमावर स्वार झाले. सेन्सेक्समध्ये सोमवारी १५४.४५ अंश भर पडून निर्देशांक ४६,२५३.४६ या टप्प्यावर प्रथमच पोहोचला. तर निफ्टी निर्देशांक आठवडय़ातील पहिल्या सत्रातील ४४.३० अंश वाढीने १३,५५८.१५ पर्यंत झेपावला. व्यवहारात १३,५९७.५० पर्यंत पोहोचणारा निफ्टी सत्रअखेरही विक्रमी नोंद करणारा ठरला. तर सेन्सेक्सचा व्यवहारातील सर्वोच्च टप्पा ४६,३७३.३४ राहिला. दोन्ही निर्देशांकात शुक्रवारच्या तुलनेत ०.३४ टक्के वाढ नोंदली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भांडवली बाजारातील परदेशी गुंतवणूकदार संस्थांचा निधीओघ नव्या सप्ताहाच्या पहिल्या व्यवहारात कायम राहिला. त्यांच्याकडून अधिकतर ऊर्जा, पायाभूत सुविधा तसेच बँक व वित्त क्षेत्रातील समभागांची जोरदार खरेदी झाली.

सेन्सेक्समध्ये ओएनजीसी ५ टक्के वाढीसह तेजीत अग्रणी राहिला. त्याचबरोबर लार्सन अँड टुब्रो, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, एचसीएल टेक, टायटन कंपनी, एशियन पेंट्सचेही मूल्य वाढले. तर महिंद्र अँड महिंद्र, बजाज ऑटो, टेक महिंद्र, बजाज फिनसव्‍‌र्ह, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज घसरले. वाहन क्षेत्रातील समभागांना घसरण फटका बसला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये भांडवली वस्तू, तेल व वायू, पोलाद, बँक वाढले. स्थावर मालमत्ता, दूरसंचार क्षेत्र रोडावले.

बर्गर किंगचे पदार्पण

विक्रमी निर्देशांक नोंद करणाऱ्या भांडवली बाजारात बर्गर किंग इंडियाने सोमवारी दमदार पदार्पण केले. जारी प्रति समभाग ६० रुपये मूल्य तुलनेत कंपनीच्या समभागाची व्यवहार सुरू होताच ११५.३५ रुपयांपर्यंत मजल गेली. सत्रअखेर तो मुंबई शेअर बाजारात १३८.४० रुपयांवर स्थिरावला. तो थेट १३१.६६ टक्क्यांपर्यंत झेपावला होता. मुंबई शेअर बाजारात त्याचे मूल्य १२५ टक्क्यांनी उंचावत १३५ रुपयांवर स्थिरावले. ८१० कोटी रुपयांची प्रारंभिक खुली भागविक्री प्रक्रिया राबविणाऱ्या कंपनीचे बाजार भांडवल ५,२८२.१० कोटी रुपये नोंदले गेले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex nifty new record abn 97
First published on: 15-12-2020 at 00:10 IST