मुंबई : अमेरिकेसह आशियाई भांडवली बाजारातील तेजीने मिळवून दिलेला उत्साह आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने भांडवली बाजारात मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात तेजीवाल्यांचा जोर राहिला. गेल्या काही दिवसांपासून सुरू राहिलेल्या विक्रीपासून फारकत घेत परकीय गुंतवणूकदारांनी देखील बाजाराला खरेदीचा हात दिला. 

अपेक्षेप्रमाणे अस्थिरतेने भारताच्या भांडवली बाजारालाही गाठले असले तरी, दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५७८.५१ अंशांनी म्हणजेच ०.९८ टक्क्यांनी वधारून ५९,७१९.७४ पातळीवर स्थिरावला. सेन्सेक्सने ९६४.५६ अंशांची झेप घेत ६०,१०५.७९ ही दिवसभरातील उच्चांकी पातळी गाठली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेदेखील १९४ अंशाची कमाई केली आणि तो १७,८१६.२५ पातळीवर बंद झाला. मात्र दिवसअखेर १८,००० अंशांची वेस ओलांडण्यास निर्देशांक अपयशी ठरला. १७,९१९ असा त्याचा दिवसांतील उच्चांक राहिला.

Hyundai Creta facelift
६ एअरबॅग्स अन् ७० हून अधिक सेफ्टी फीचर्स असलेल्या SUV ला ग्राहकांची तुफान मागणी; ३ महिन्यात १ लाख कारची बुकींग
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ
During the financial year the market value of 80 companies exceeded lakhs of crores
सरलेल्या आर्थिक वर्षात ८० कंपन्यांचे बाजारमूल्य लाख कोटींपुढे

पश्चिमात्य भांडवली बाजारातील घसरणीचा देशांतर्गत बाजारावर कोणताही परिणाम झाला नाही. शिवाय अमेरिकी मध्यवर्ती बँकेकडून होणारी व्याजदर वाढ अटळ असली तरी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष करत समभाग खरेदी सुरू ठेवली आहे. बाजारातील प्रत्येक घसरणीत गुंतवणूकदार खरेदी करत असल्याचा कल निदर्शनात येत आहे. याचबरोबर गेल्या काही सत्रांमध्ये औषधी निर्माण आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये आलेली घसरण थांबली असून गुंतवणूकदारांनी कमी किमतीला समभाग खरेदीला प्राधान्य दिले. प्रतिकूल जागतिक आर्थिक परिस्थितीत उर्वरित जगाच्या तुलनेत भारतीय कंपन्यांच्या समभागांचे मूल्य वाजवी वाटत असल्याने परदेशी गुंतवणूकदार देखील सक्रिय झाले आहेत, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये सन फार्मा, डॉ. रेड्डीज, इंडसइंड बँक, टाटा स्टील, टायटन, बजाज फिनसव्‍‌र्ह, आयसीआयसीआय बँक आणि एशियन पेंट्सचे समभाग सर्वाधिक तेजीत होते.

‘एफआयआय’कडून ओघ

मुंबई शेअर बाजाराकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सोमवारच्या सत्रात ३१२.३१ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हकडून होणारम्य़ा संभाव्य व्याजदर वाढीकडे दुर्लक्ष करत एफआयआय भारतीय भांडवली बाजारात पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे.