विजेच्या उत्पादनांची निर्मितीतील कंपनी सूर्या रोशनीने पुढील चार वर्षांमध्ये ५००० कोटी रुपयांच्या घरात असलेल्या पंख्यांच्या बाजारपेठेतील १० टक्के वाटा मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनीने अलीकडेच या क्षेत्रात पदार्पण केले असून पंख्यांची तब्बल २४ उत्पादने दाखल केली आहेत.
 सूर्याने ‘पिक मी’ ही सीलिंग, टेबल, पेडेस्टल आणि िभतींवरील पंख्यांच्या नवीन डिझाईनसह विस्तृत श्रेणी दाखल करण्याची योजना आखली आहे. त्याचबरोबर घरगुती वापराच्या एक्झॉस्ट पंख्यांची रेंजही दाखल केली जाणार असून भारत व परदेशांतील ग्राहकांना वीजबचत करता येईल, अशा तंत्रज्ञानाचा यात समावेश आहे, असे निवेदन सूर्या रोशनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. राजू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. देशभरातील दोन लाख दुकानदारांच्या माध्यमातून विक्री, तर जगभरात ४४ देशांमध्ये ही उत्पादने निर्यात करण्याचेही कंपनीचे लक्ष्य आहे.