डेबिट/ क्रेडिट किंवा नेटबँकिंगच्या वापराशिवाय ई-व्यवहार शक्य
डिजिटल पेंमेट क्षेत्रातील ३.५ कोटींहून अधिक ग्राहक असलेली कंपनी सुविधा इन्फोसव्र्हने आता देशाच्या सर्वात मोठय़ा स्वतंत्र मोबाइल पेमेंट नेटवर्क असलेल्या मोबिक्विकसोबत संयुक्त व्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोबिक्विक वॉलेटचे ग्राहक या संयुक्त व्यवहार सामंजस्यामुळे पैशाचा पुनर्भरणा (रिचार्ज) करण्यासाठी भारतभरातील ९०,००० हून अधिक सुविधा केंद्रांचा संपर्कबिंदू वापरू शकतील. यामुळे क्रेडिट / डेबिट अथवा नेट बँकिंगच्या माध्यमातून होणाऱ्या पुनर्भरणाच्या अडथळ्यावर त्यांना मात करता येईल. म्हणजे त्यांच्या हाती असणारा मोबाइलच त्यांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचे एकमेव माध्यम व साधन म्हणून त्यांना राखता येईल, असे सुविधा इन्फोसव्र्हचे संस्थापक परेश राजदे यांनी सांगितले. भारतातील ६०कोटींहून अधिक लोक डेबिट अथवा क्रेडिट कार्ड वापरत असूनही, त्यापैकी ९० टक्क्य़ांहून अधिक लोक अजूनही ऑनलाइन आर्थिक विनिमयांसाठी त्यांचा वापर करीत नाहीत, या बाबीकडे राजदे यांनी लक्ष वेधले.
ही भागीदारी जे ग्राहक आजही बँक अथवा कार्डच्या सेवेपासून दूर आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे डेबिट अथवा क्रेडिट कार्ड नाहीत, त्यांना मोबाइल -कॉमर्सच्या सेवा उपभोगण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्याप्रमाणेच, जे ग्राहक कार्ड पेमेंटची सेवा बँक खात्याची माहिती पुरवण्याबाबत सुरक्षिततेच्या भावनेतून संदिग्ध असतात. तेही आता फोनवर मोबिक्विक अॅप डाऊनलोड करून अथवा स्वत: नोंदणी करून त्यांच्या मोबिक्विक एम-वॉलेट्मध्ये पैसे भरण्यासाठी सुविधा केंद्रांचा उपयोग करून घेऊ  शकतात. तर मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून, देयकांचा भरणा, रिचार्ज, आप्तस्वकीयांना तात्काळ पैशांचे हस्तांतरण, प्रवासाच्या तिकिटांचे आरक्षण, सिनेमा तिकीट बुकिंग तसेच भेटवस्तू अशा निरनिराळ्या ई-सेवांच्या वापरासाठी करू शकतात.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suvidhaa infoserve ties up with mobile wallet company mobikwik
First published on: 27-05-2016 at 07:33 IST