मुंबई : व्यावसायिकांना उत्पादित मालाच्या वाहतुकीसाठी सहजपणे आणि तत्काळ ई-वे बिल तयार करणे शक्य होईल आणि विविध पदर असणाऱ्या वेगवेगळ्या व्यवस्था आणि त्यातील डेटा हाताळण्याची गरज संपेल, अशी सोयीस्कर व सुलभ उपाययोजना ‘टॅली प्राइम’ या नावाने प्रस्तुत झाली आहे. बिल तयार करणे, रद्द करणे, पूर्ण करणे, या प्रक्रियेतील विलंब वगैरे वेगवेगळ्या पातळीवरील कामे थेट सॉफ्टवेअरद्वारे हाताळणे टॅली सोल्युशन्स द्वारे विकसित या सुविधेमुळे शक्य होऊ  शकेल.

टॅलीच्या या सुविधेमुळे व्यवसाय अधिक सक्षम होण्यासह, व्यावसायिकांचा विविध कामावरील खर्चही कमी होईल, असा विश्वास टॅली सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय संचालक तेजस गोएंका यांनी व्यक्त केला. ई-वे बिल तयार होण्याच्या पूर्ण प्रक्रियेशी संबंधित सगळ्या कामकाजावर लक्ष  ठेवले जाईल.