डीटीएच परवाना शुल्काबाबत दूरसंचार लवादापुढे सुनावणी कायम असतानाही टाटा स्कायने गेल्या वर्षीचे शुल्क व थकित रक्कम असा एकूण ३८३ कोटी रुपयांचा धनादेश केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याकडे जमा केला आहे.
न्यायव्यवस्थेचा आदर कायम राखत आम्ही परवाना शुल्क आणि गेल्या काही कालावधीतील थकित रक्कम मिळून हे वेतन देय केले आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक हरित नागपाल यांनी म्हटले आहे.
टाटा स्काय ही टाटा समूहातील डीटीएच सेवा पुरवठादार कंपनी आहे. स्टार समूहाबरोबर कंपनीची यासाठी भागीदारी आहे. कंपनीसह अन्य डीटीएचचाही सध्या सरकारविरुद्ध परवाना शुल्कावरून वाद सुरू आहे.
सेवा पुरवठय़ापोटी मिळणाऱ्या महसुलापैकी १० टक्के रक्कम सरकारकडे वार्षिक परवाना शुल्क म्हणून जमा करण्याची तरतूद आहे. यानुसार मार्च २०१४ मध्ये सहा सेवा पुरवठादारांना २,००० कोटींच्या मागणीची नोटीस बजाविली आहे.