अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर सप्ताहभर तेजीची कामगिरी नोंदविणारा मुंबई निर्देशांक त्याच्या गेल्या १० महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. आठवडय़ातील अखेरच्या सत्रात ५०० हून अधिक अंशांची भर नोंदविताना मुंबई निर्देशांक ४२ हजारानजीक स्थिरावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आठवडय़ातील पाचही व्यवहारात तेजी नोंदविणाऱ्या मुंबई निर्देशांकात या दरम्यान २२७८.९९ अंश तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात सप्ताहात ६२१.१५ अंश वाढ झाली आहे. टक्केवारीत हे प्रमाण अनुक्रमे ५.७५ व ५.३३ आहे.

सेन्सेक्स यापूर्वी १४ जानेवारीला शुक्रवारच्या वरच्या टप्प्यानजीक होता. शुक्रवारी निफ्टीत १४३.२५ अंश वाढ होऊन १२,२६३.५५ वर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने सप्ताहअखेरची कामगिरी नोंदविली. मुंबई निर्देशांकाने आतापर्यंत ४२,२७३ हा सर्वोच्च टप्पा २०२० वर्षांच्या सुरुवातीला गाठला होता. शुक्रवारचा त्याचा ४१,३८३.२९ हा किमान तर ४१,९५४.९३ हा वरचा टप्पा राहिला.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी जवळपास अर्ध्या टक्क्यापर्यंत वाढले.

रुपया अधिक भक्कम

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सलग दुसऱ्या व्यवहारात वाढले. परकीय चलन विनिमय मंचावर स्थानिक चलन २८ पैशांनी भक्कम होत आठवडय़ाच्या शेवटच्या व्यवहारात ७४.०८ वर स्थिरावले. ७४ वरील, ७३.९९ने सुरुवात करणारा रुपया व्यवहारात ७३.८७ पर्यंत झेपावला. तर ७४.२८ हा त्याचा सत्रतळ राहिला. दिवसअखेर त्यात गुरुवारच्या तुलनेत भर पडली. सप्ताह तुलनेत स्थानिक चलन अवघ्या २ पैशांनी वाढले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल २ टक्क्य़ांनी घसरून प्रति पिंप ४० रुपयांवर स्थिरावले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten month high for the sensex abn
First published on: 07-11-2020 at 00:21 IST