मुंबई : जागतिक पातळीवर प्रमुख भांडवली बाजारातील तेजीचे पडसाद देशांतर्गत बाजारावर उमटत शुक्रवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी २ टक्क्यांनी वधारले. गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान, धातू आणि वित्त कंपन्यांच्या समभागांमध्ये जोरदार खरेदी केली. अमेरिकेतील महागाई अपेक्षेपेक्षा अधिक नरमल्याने जगभरात तेजीचे वारे संचारले.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सलग चार सत्रात एक रुपयांहून अधिक मजबूत झालेले स्थानिक चलन आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून अखंड सुरू राहिलेली खरेदी आणि  भांडवलाच्या ओघामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण होते.

bse sensex rise 599 points to settle at 73088
तेजीवाल्यांची पुन्हा सरशी; तणाव निवळल्याने सेन्सेक्सची सहा शतकी दौड
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Sensex Hits Record, High, 75 thousands Points, Nifty Touches 22753 Points, sensex nifty high, share market, stock market, finance, finance knowledge, finance article, share market high, stoke markte high, marathi news,
सेन्सेक्स प्रथमच ७५ हजारांवर विराजमान
sensex, 75000 points , share market news loksatta,
‘सेन्सेक्स’ची ऐतिहासिक ७५ हजारांच्या शिखरावरून माघार

सप्ताहअखेर भांडवली बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी ५२ आठवडय़ांतील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. सेन्सेक्स १,१८१.३४ अंशांनी म्हणजेच १.९५ टक्क्यांनी वधारून दिवसअखेर ६१,७९५.०४ पातळीवर बंद झाला. निर्देशांकाने दिवसभरात ६१,८४०.९७ अंशांच्या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे निफ्टीने ३२१.५० (१.७८ टक्के) अंशांची भर घातली आणि तो दिवस सरताना १८,३४९.७० पातळीवर स्थिरावला.

जगभरातील भांडवली बाजारांमध्ये आलेल्या तेजीच्या लाटेमध्ये देशांतर्गत बाजारदेखील सामील झाला. अमेरिकेतील किरकोळ महागाई दर सप्टेंबरमधील ८.२ टक्क्यांच्या स्तरावरून घसरत, ऑक्टोबरमध्ये ७.४ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. महागाई दराच्या या सकारात्मक आकडेवारीमुळे आगामी काळात फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदर वाढीबाबत नरमाईची भूमिका घेतली जाण्याची आशा आहे. परिणामी रोख्यांवरील परतावा दर कमी होण्याच्या शक्यतेने आगामी काळात परदेशी गुंतवणूकदारांकडून देशांतर्गत बाजारात ओघ वाढण्याची शक्यता आहे. शिवाय मंदीची भीती कमी झाल्याने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मूल्य तेजीत आघाडीवर राहिले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये एचडीएफसीचा समभाग ५.८४ टक्के तेजीत होता. त्यापाठोपाठ एचडीएफसी बँक, इन्फोसिस, टेक मिहद्र, एचसीएल टेक, टीसीएस, विप्रो, टाटा स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग वधारले.

नायकाच्या समभागात तेजी

बक्षीस समभागाच्या खेळीने आणि बरोबरीने बाजाराचा मूडही पालटल्याने, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचरचा (नायका) समभाग सलग दुसऱ्या सत्रात तेजीत होता. शुक्रवारच्या सत्रात समभाग २० टक्क्यांनी वधारत २२४.४५ या सत्रातील उच्चांकी पातळीवर पोहोचला. दिवसअखेर समभाग  २०.०५ रुपयांनी वधारून २०८ रुपयांवर स्थिरावला.

रुपया ६२ पैशांनी वधारला

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत शुक्रवारच्या सत्रात रुपया ६२ पैशांनी वधारून ८०.७८ पातळीवर स्थिरावला. अमेरिकेमध्ये महागाईमध्ये आलेली नरमाई आणि डॉलर निर्देशांक घसरल्याने गुंतवणूकदारांमध्ये चैतन्य निर्माण झाले. परदेशी विनिमय चलन बाजारात रुपयाने ८०.७६ या भक्कम पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरातील सत्रात रुपयाने ८०.५८ ही उच्चांकी तर ८०.९९ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. गुरुवारच्या सत्रात ८१.४० रुपये या पातळीवर चलन स्थिरावले होते. गेल्या चार सत्रात रुपया १५९ पैशांनी मजबूत झाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीचा देखील रुपयावर सकारात्मक परिणाम झाला आहे.