अनुचित व्यापार प्रथांच्या अवलंबाबद्दल सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा कंपनी ‘कोल इंडिया लिमिटेड’वर भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) ठोठावलेल्या १,७७३ कोटी रुपयांच्या महादंडाला स्पर्धा अपील लवाद (कॉम्पॅट)ने बुधवारी स्थगिती दिली.
स्पर्धा आयोगाच्या ९ डिसेंबर २०१३च्या आदेशाला आव्हान देणारा कोल इंडियाने दाखल केलेला अर्ज सुनावणीला घेताना लवादाने हा स्थगिती आदेश दिला. तथापि कंपनीला संपूर्ण दंड तूर्तास भरावा लागणार नसला तरी तीन आठवडय़ांच्या आत ५० कोटी रुपयांची अनामत रक्कम मात्र जमा करावी लागणार आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १३ मार्चला होईल.