ट्रिव्ह्रिटॉन हेल्थकेअरचे १५८ लाख युरोचे अधिग्रहण

रोगनिदान क्षेत्रातील मुंबईस्थित आघाडीची कंपनी ट्रिव्ह्रिटॉन हेल्थकेअरने जागतिक पातळीवर व्यवसाय-विस्ताराच्या मोहिमेचा भाग म्हणून फिनलंडस्थित अ‍ॅनी लॅबसिस्टीम्सवर १०० टक्के ताबा मिळविल्याची घोषणा केली आहे.

 रोगनिदान क्षेत्रातील मुंबईस्थित आघाडीची कंपनी ट्रिव्ह्रिटॉन हेल्थकेअरने जागतिक पातळीवर व्यवसाय-विस्ताराच्या मोहिमेचा भाग म्हणून फिनलंडस्थित अ‍ॅनी लॅबसिस्टीम्सवर १०० टक्के ताबा मिळविल्याची घोषणा केली आहे. अ‍ॅनी लॅबसिस्टीम्स ही एक समूह कंपनी असून, तिच्या अंतर्गत अ‍ॅनी बायोटेक, बायोपॉइंट आणि के३ असा कंपन्या कार्यरत आहेत. टिव्ह्रिटॉनने या समूहातील चारही कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. या कंपन्यांचे एकत्रीकरण करून ‘लॅबसिस्टीम्स डायग्नोस्टिक्स ओवाय-ए-टिव्ह्रिटॉन ग्रुप कंपनी’ या नावाने ती ओळखली जाणार आहे. यमुळे जागतिक स्तरावर ही चौथी मोठी वैद्यकीय तंत्रज्ञान कंपनी बनली आहे. टिव्ह्रिटॉनच्या निओनॅटल स्क्रिनिंग, कार्डिअ‍ॅक बायोमार्कर्स, गॅस्ट्रो आणि रेस्पिरेटरी डायग्नोस्टिक किट्सची निर्मिती फिनलंडमधून सुरू होईल, तर संसर्गजन्य, महिलासंबंधीच्या आजारावरील निदान उपकरणांची निर्मिती चेन्नईतून करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Trivitron healthcare requisit 158 lacs uro

ताज्या बातम्या