९० टक्के भागीदारी होणार; हिस्सा वाढविणार
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेल व वायू व्यवयासात आणखी एक ब्रिटन कंपनी भागीदारी होण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स समुहाच्या गुजरातनजीकच्या समुद्रातील तेल व वायू विहिरींमधील ९० टक्के हिस्सा खरेदीची तयारी ब्रिटनच्या हार्डीऑईल अॅन्ड गॅस कंपनीने दाखविली आहे.
रिलायन्स समुहातील याच क्षेत्रातील व्यवसायात ब्रिटनची बीपी ही कंपनीदेखील भागीदार आहे. तेल व वायू उत्खनन क्षेत्रातील तिचे कार्य आहे. तर गुजरात-सौराष्ट्र समुद्रातील जीएस-०१ या इंधन विहिरींमधील मोठा हिस्सा खरेदीची शक्यता हार्डीने तिच्या वार्षिक ताळेबंदात व्यक्त केली आहे. या कंपनीतील हिस्सा खरेदीसह प्रमुख उत्सर्जन कार्यरत होण्याची इच्छाही ब्रिटनच्या या कंपनीने व्यक्त केली आहे.
याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तेल मंत्रालयाच्या महासंचालकांबरोबर चर्चाही केल्याचे सांगण्यात आले आहे. कंपनी २००९ पासून याबाबतच्या प्रयत्नात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या धीरुभाई ३३ नैसर्गिक वायू उत्सर्जन कार्यक्रम सरकारला २०१२ मध्येच सादर करण्यात आला होता. त्याचाच ब्रिटनची संभाव्य भागीदारी आहे. हार्डीचा सध्या रिलायन्सच्या या विहिरींमध्ये १० टक्के आहे. विदेशी कंपनीने ही गुंतवणूक २००७ मध्ये केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2015 रोजी प्रकाशित
रिलायन्सच्या तेल व वायू विहिरींसाठी ब्रिटनच्या कंपनीची उत्सुकता
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेल व वायू व्यवयासात आणखी एक ब्रिटन कंपनी भागीदारी होण्याच्या तयारीत आहे.

First published on: 27-11-2015 at 00:34 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uk companys interest in reliance oil and gas wells