अमेरिकी चलनाचे मूल्य उंचावत असताना भांडवली बाजारात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांचे मूल्यही उंचावले. वधारत्या डॉलरच्या रूपात वाढीव महसुलाच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांकडून आलेल्या मागणीने हे समभाग तीन टक्क्यांपर्यंत भाववाढ मिळवून गेले. माहिती निर्देशांकदेखील जवळपास सव्वा टक्क्याने वधारला. मुंबई शेअर बाजारात क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही हाच निर्देशांक तेजीत वरचढ राहिला. वधारत्या डॉलरमुळे एकंदरच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची भांडवली बाजारावर मूल्यवधारणेची कामगिरी सुरू असताना अमेरिकेतील कंपनी खरेदीने टेक महिंद्रच्या समभाग मूल्यातही २.९७ टक्क्यांची भर टाकली.
माइंडट्री रु. १,२३४.१५ (+५.५२%)
हेक्झावेअर टेक रु. २२३.५० (+३.६९%)
केपीआयटी टेक रु. १७२.२० (+१.५६%)
विप्रो रु. ५७२.३० (+१.२५%)
एचसीएल टेक रु. १,६४८.६५ (+१.०९%)
टीसीएस रु. २,६०५.४५ (+१.०८%)
ओरॅकल फिनसव्र्ह रु. ३,२९०.०५ (+१.०७)
इन्फोसिस रु. ४,२२१.७० (+१.००%)
संग्रहित लेख, दिनांक 21st Nov 2014 रोजी प्रकाशित
वधारत्या डॉलरने ‘आयटी’ला उभारी
अमेरिकी चलनाचे मूल्य उंचावत असताना भांडवली बाजारात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांचे मूल्यही उंचावले.
First published on: 21-11-2014 at 12:26 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us dollars to indian rupees