आजच्या भागात महाराष्ट्र शासनाच्या सेवेत प्रथम श्रेणी अधिकारी असलेल्या उत्तम सुर्वे (३१) यांचे आíथक नियोजन पाहू. मुळचे सांगली जिल्ह्यातील दुधोंडी (तालुका पलूस) गावाचे असलेले सुर्वे व त्यांच्या पत्नी (२८) हे सध्या नोकरी निमित्ताने रत्नागिरी येथे राहत आहेत. लवकरच त्यांच्या कुटुंबात नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे. आई, वडील व आजी हे गावी शेती करतात. त्यांची एक एकर शेती असून भविष्यात त्यांना पाच एकर शेती विकत घ्यायची आहे. नोकरीतून मिळणारे वेतन, शेती व शेती पूरक व्यवसायातून मिळणारे उत्पन्न असे त्यांचे उत्पन्नाचे तीन स्त्रोत आहेत. ते शासनाच्या सेवेत १ जानेवारी २००६ नंतर आल्यामुळे त्यांना अंशत: सेवानिवृती वेतन योजना लागू आहे. त्यांच्या वेतनातून दरमहा ५,००० रु. पेन्शन योजनेसाठी कपात होते. शासनाकडून तेवढीच रक्कम त्यांच्या खात्यात जमा होते व भविष्यात या योजनेत जमा होणाऱ्या रक्कमेतून त्यांना निवृती वेतन मिळणार आहे. त्यांचे पीपीएफ खाते असून या खात्यात ते २०११ पासून दरवर्षी १०,००० रु. जमा करत आहेत. तसेच आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्लूचिप इक्विटी व एसबीआय इमाìगग बिझनेस फंड या दोन फंडात मे २०११ पासून ते दरमहा १,००० रुपये एसआयपी करत आहेत. त्यांच्याकडे ३० हजार रुपये मूल्य असलेले शेअर्स आहेत. तर चार लाखाचे वाहन कर्ज आहे. त्यांनी एलआयसीची रिटायरमेंट अँड एन्जॉय ही पॉलिसी घेतली असून त्याचा वार्षकि ३३,६०० रुपयांचा हप्ता त्यांना पडतो.
उत्तम सुर्वे यांनी आपली वितीय ध्येये निश्चित केली आहेत, ती अशी-
* गावाकडील घराचे नूतनीकरण करणे
* पुण्यात एक सदनिका घेणे
*  भविष्यात गावाकडे पाच एकर शेती घेणे
* कुटुंबाच्या भविष्यासाठी तरतूद करणे
उत्तम सुर्वे यांना सल्ला :
उत्तम सुर्वे यांनी त्यांच्या आíथक ध्येयांची प्राथमिकता निश्चित करणे आवश्यक आहे. अनेक शासकीय अधिकारी नोकरी निमित्ताने एखाद्या शहरात आणि त्यांचे कुटुंब हे मुलांचे शिक्षण वा पत्नीची नोकरी निमित्ताने दुसऱ्या शहरात वास्तव्यास असे आढळून येते. काही गोष्टींचे नियोजन करता येते. काहींचे १०० टक्के नियोजन शक्य नसते. हा मुद्दा आजच्या निमित्ताने आठवला कारण आधी शेती की आधी पुण्यात सदनिका हे ठरविणे गरजेचे आहे. दोन्ही गुंतवणुका स्थावर मालमत्तेत असून. कुठलीही गोष्ट आधी केली तरी तुमच्या आíथक नियोजनावर त्याचे दूरगामी परिणाम होणार, तेव्हा याची प्रथामिकता जितक्या लवकर ठरवाल तितके आíथक नियोजन सुटसुटीत होईल.
जर कुटुंबात येणारा नवीन पाहुण्याच्या शिक्षणाच्या दृष्टीने पुणे योग्य आहे असा विचार असेल तर पुण्यात सदनिका घेणे इष्ट ठरेल. पुष्कळदा गरज नसलेल्या गोष्टी (यात गुंतवणुका सुद्धा आल्या) आपण विकत घेतो व ज्यांची खरोखरच गरज आहे अशा गोष्टींपासून आपण वंचित राहतो. म्हणून पुण्यात सदनिका घेणे कितपत गरजेचे आहे याचा विचार करा. गृहकर्ज मात्र राष्ट्रीयीकृत बँकेतून घ्या. पगार वाढत असतात, आजचा जड वाटणारा गृहकर्जाचा हप्ता चार पाच वर्षांनंतर त्याचे ओझे वाटत नाही. म्हणून आधीपासूनच १५-२० वर्ष मुदतीचे कर्ज न घेता आठ ते १० वर्षांचे कर्ज घ्या. जेणेकरून तुम्ही लवकर कर्ज मुक्त व्हाल. अनेकदा बँका कर्ज मंजूर करताना एखादी पॉलिसी घेण्याचा आग्रह धरतात. म्हणून कर्जाचा अंदाज घेऊन एक टर्म पॉलिसी घ्या. कर्ज घेतल्यावर याच पॉलिसीचे नामनिर्देशन सदर बँकेच्या नावे करून देता येईल. घर कधी घेणार व त्यासाठी तुमचे स्वत:चे किती पसे तुम्हाला उभे करावे लागणार आहेत हा निर्णय झाल्यावर गुंतवणुकीचा निर्णय घेणे सोपे होईल जर तीन वर्षांहून कमी काळात तुम्हाला तुमचे गुंतविलेल्या पशाची गरज लागणार असेल तर समभागसदृश्य गुंतवणूक टाळलेली उत्तम. परंतु पाच वर्षांनंतर जर तुम्हाला ही रक्कम लागणार असेल तर जरूर इक्विटी म्युच्युअल फंडाचा विचार करा.
‘मिस सेिलग’ला केवळ विमा विक्रेतेच जबाबदार आहेत असे नव्हे. विमाइच्छुक व्यक्ती नक्की कोणती उत्पादने उपलब्ध आहेत, आपल्या गरजा स्पष्ट न कारता विमा खरेदी करतात. अनेकदा विमा विक्रेते आपल्याला फायद्याची योजना विमा खरेदीदाराला विकतात. एलआयसीच्या जीवन अक्षय व न्यू जीवन निधी हे दोन पेन्शन प्लान आहेत. ‘रिटायर अ‍ॅँड एन्जॉय’ नावाची कुठलीही एलआयसीचे अधिकृत उत्पादन नाही. विमा विक्रेते अनेकदा दोन तीन योजना एकत्र विकून त्याला ‘रिटायरमेंट अँड एन्जॉय’ असे म्हणतात. ही विमा विक्रेत्याची चलाखी आहे. एका तुमच्यासारख्या कुटुंबाचा आíथक आधार असलेल्या व्यक्तीला मोठ्या विमाछत्राची आवश्यकता आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या विमा विक्रेत्याने एलआयसीची अमूल्य जीवन (टर्म प्लान) घेण्याची शिफारस केली असती तर ते अधिक योग्य ठरले असते. तुम्ही पीपीएफ खात्यात अतिशय तुटपुंजी रक्कम जमा करत आहात. वार्षकि कमीतकमी एका वेतनाइतकी रक्कम पीपीएफ मध्ये जमा होणे गरजेचे आहे. टर्म प्लान व जास्तीची रक्कम तुमच्या पीपीएफ खात्यात जमा करणे हे तुमच्या दृष्टीने योग्य ठरेल.
तुमची अजून सेवेची २९ वष्रे शिल्लक आहेत. म्हणून २९ वष्रे मुदत असलेला एक टर्म प्लान खरेदी करणे योग्य ठरेल. दीड कोटीचे विमाछत्र  व २९ वष्रे मुदत असलेल्या विम्यास वार्षकि अंदाजे ६० हजार रुपये हप्ता पडेल. हा टर्म प्लान विकत घेण्यासाठी एलआयसीचा ई-टर्म, किंवा एचडीएफसी लाइफचा ‘क्लिक टू प्रोटेक्ट’चा विचार करा.
तुम्ही ‘एसआयपी’साठी निवडलेल्या योजना चांगल्या आहेत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्ल्याूचिप इक्विटी ही लार्जकॅप तर, एसबीआय इमाìगग बिझनेस फंड ही मिड व स्मॉलकॅप समभागांमध्ये गुंतवणूक असलेल्या योजना आहेत. तुम्ही पाच वष्रे या दोन फंडात ‘एसआयपी’ सुरु ठेवलीत तर पुढील पाच वर्षांंनंतर साधारण १६ ते १८ टक्के परतावा मिळू शकेल.
प्रत्येक गोष्टीला काळाचे बंधन असणे गरजेचे आहे. गावाकडच्या घराचे नूतनीकरण काय किंवा पुण्यातील घर खरेदी काय नक्की केव्हा करायची याचा विचार जरुरीचा आहे. जेणेकरून गुंतवणुकीसाठी स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजना निवडायच्या की समभागसदृश्य गुंतवणूक करायची आणि त्यासाठीही कुठली गुंतवणूक साधने निवडायची याचा विचार करता येईल. म्हणून वित्तीय ध्येयांच्या बरोबर त्यांचा अग्रक्रम व त्यासाठी समयसीमा ठरविणे योग्य असते हाच सल्ला या निमित्ताने देता येईल.
(या सदरातून केलेले आíथक नियोजन त्या त्या कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन केलेले असते. त्या कुटुंबाची सर्वसाधारण पाश्र्वभूमी दिलेली असली तरीही सर्वच गोष्टी शब्दमर्यादेच्या अभावी देता येत नाहीत. त्यामुळे सुचविलेले नियोजन त्या त्या कुटुंबांपुरते असते. या व्यतिरिक्त एखाद्या कुटुंबाने सुचविलेले उत्पादन अथवा सेवेची खरेदी करण्यापूर्वी आपल्या वित्तीय नियोजकाचा सल्ला घेणे योग्य ठरेल.)
उत्तम सुर्वे यांना सल्ला :
* घराचे नूतनीकरण व पुण्यातील सदनिका खरेदी यांची समयसीमा निश्चित करा
* गृहकर्ज घेण्यापूर्वी कर्जाच्या रकमेइतका व कर्जाची मुदत जितकी असेल त्या मुदतीचा एक टर्म प्लान घ्या.  
* तुमच्या सुरु असलेल्या ‘एसआयपी’ दीर्घकाळ सुरु ठेवा.
* कमीतकमी मासिक वेतनाइतकी रक्कम तरी दरवर्षी तुमच्या पीपीएफ खात्यात जमा करा.
———————————————–
चुकीची दुरुस्ती
‘अर्थ वृत्तान्त’ २३ जून २०१४ रोजी या स्तंभातून अमृत साबडे यांचे आíथक नियोजन करीत असताना वार्षकि ३२ हजाराचा हप्ता २५ वष्रे भरत आहेत आणि या पॉलिसीचे त्यांच्या विमा विक्रेत्याला २,८८,७५० रु. कमिशन मिळेल असे विधान अनवधानाने केले गेले आहे. या पॉलिसीचे कमिशन म्हणून ५१,७६० रु. मिळणार आहेत.