05 June 2020

News Flash

जेपी मॉर्गन इंडिया इकॉनॉमिक रिसर्जन्स फंड

अन्य फंड घराणी मालमत्तेच्या स्पध्रेत उतरून व विक्रेत्यांना मोठे आमिष देऊन तीन ते पाच वर्षांच्या मुदतबंद योजना आणत असताना गुंतवणुकीस कायम खुला असलेला आणि ‘एसआयपी’द्वारे

| January 19, 2015 01:01 am

अन्य फंड घराणी मालमत्तेच्या स्पध्रेत उतरून व विक्रेत्यांना मोठे आमिष देऊन तीन ते पाच वर्षांच्या मुदतबंद योजना आणत असताना गुंतवणुकीस कायम खुला असलेला आणि ‘एसआयपी’द्वारे नियमित छोटय़ा रकमेची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास वाव देणारा फंड म्हणूनही हा नवीन फंड लक्षवेधी ठरतो.
आíथक सेवा क्षेत्रात जेपी मॉर्गन या दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या कंपनीच्या भारतातील मालमत्ता व्यवस्थापन कंपनीने हा फंड प्रवíतत केला आहे. मोदी सरकारचे भारतातील उत्पादन क्षेत्राला गती देण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ हे धोरण आखले आहे. या धोरणाचा व सरकारच्या उद्योगस्नेही धोरणाचा ज्या कंपन्यांना फायदा होणार आहे अशा कंपन्यांच्या समभागांत या फंडाचा निधी गुंतविला जाईल.
जेपी मॉर्गनने हा फंड सुरु करण्यापूर्वी या तिच्या विश्लेषकांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. हे निष्कर्ष या फंडाच्या सदरीकाराणासाठी प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात दिलेले आहेत. यातील एक प्रमुख निष्कर्ष म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती प्रत्येक दहा डॉलर प्रति िपप घटल्यानंतर परकीय चलन व्यवहार, चालू खात्यावरील तुटीत होणारी सुधारणा व पर्यायाने अर्थव्यवस्थेस मिळणारी चालना यांची गणिते मांडून २०१० ते २०१३ या कालावधीत अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीचे विवेचन केले आहे. एका बाजूला कमी होत असलेली महागाई साडे पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर असलेले कच्च्या तेलाचे भाव याचा सकारात्मक परिणाम देशाच्या औद्योगिक उत्पादनावर दिसून येईल.
केंद्रात झालेल्या सत्ताबदलांनंतर आलेले नवीन सरकार हे गुंतवणूकदारस्नेही धोरणे आखत आहे. आíथक सुधारणांना गती देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचे दिसून येते. यासाठी या फंड घराण्याने जमीन सुधारणा विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर न झाल्याने सरकारने वटहुकूम काढल्याचे उदाहरण दिले आहे. अनेक प्रकल्प सरकारच्या निर्णय निष्क्रियतेमुळे रखडले होते. सरकारच्या विविध उपाययोजनेमुळे या प्रकल्पांना गती मिळणार आहे. ‘स्मार्ट सिटी’ सारख्या प्रकल्पांमुळे अनेक उद्योगांना गती मिळेल. सरकारने विविध महामार्गाचे जाळे विणण्याचे धोरण सीमेंट उद्योगाला चालना मिळून देईल. वाढत्या नागरीकारणामुळे वाढत्या पायाभूत सुविधांसाठी दरवर्षी ३,५०० कोटी गुंतवणुकीचा अंदाज या फंड घराण्याने मांडला आहे. या गुंतवणुकीतून रस्ते, पाणी पुरवठा, वीज निर्मिती, शिक्षण, आरोग्यनिगा, मनोरंजन खेळासाठी सुविधा यांची निर्मिती होणार असून या गुंतवणुकीतील मोठा वाटा खाजगी क्षेत्राचा असेल. या क्षेत्रातील कंपन्या हा नवीन फंड गुंतवणुकीसाठी निवडेल. या कंपन्यांचा नफा पुढील १० ते १२ वष्रे १७ ते २० टक्क्य़ांनी वाढविणारा असेल, असे गृहितक फंड घराण्याने सादरीकरणात दिले आहे.
सादरीकरणातील सप्टेंबर २००६ ते डिसेंबर २०१४ या कालावधीतील कंपन्यांच्या उत्सर्जनाची आकडेवारी पाहता सध्याचा निर्देशांक नवीन गुंतवणूक करण्यास धोकादायक पातळीवर आहे, असे फंड घराण्यास वाटते.
निधी व्यवस्थापकाचे विचार या फंडाचा पोर्टफोलिओ कसा असेल या बाबतीत सुस्पष्ट आहेत. पारंपारिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या औषध निर्माण, ग्राहकोपयोगी वस्तू या उद्योग क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागांमध्ये अल्प गुंतवणूक असेल व प्रामुख्याने बँकिंग, वाहन उद्योग, चांगल्या स्थितीत ताळेबंद असलेल्या पायाभूत सुविधा क्षेत्रांतील कंपन्यांना गुंतवणुकीत मोठा वाव दिला जाईल. निधी व्यवस्थापनाचे गुंतवणूक धोरण कागदावर जरी उत्तम असले तरी हे धोरण प्रत्यक्षात राबविण्यात निधी व्यवस्थापक कितपत यशस्वी होईल यावर या फंडाच्या परताव्याचा दर ठरेल. या फंडातील गुंतवणूक १८ महिन्यांच्या आत काढून घेतल्यास दीड टक्क्याचे निर्गमन शुल्क (एक्झिट लोड) लागू असेल.
 या आधी जून २०१४ मध्ये या फंड घराण्याने आणलेल्या ‘जेपी मॉर्गन इंडिया टॉप हंड्रेड’ या फंडाचा परताव्याचा दर या फंड गटातील इतर फंडांच्या सरासरी परताव्यापेक्षा दोन तिमाहीत एक ते पाऊण टक्क्यांनी कमी आहे. परंतु केवळ दोन तिमाहीच्या परताव्याच्या दरावर फंडाची कामगिरी तपासणे निधी व्यवस्थापकावर अन्यायकारक ठरेल. अन्य फंड घराणी मालमत्तेच्या स्पध्रेत उतरून विक्रेत्यांना मोठे आमिष देऊन तीन ते पाच वर्षांच्या मुदतबंद योजना आणत असताना गुंतवणुकीस कायम खुला असलेला व त्यामुळे ‘एसआयपी’ द्वारे नियमित छोटय़ा रकमेची टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास वाव असलेला फंड गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिल्याबद्दल हे फंड घराणे निश्चितच अभिनंदानास पात्र आहे. थोडक्यात एखादी कमी रकमेची ‘एसआयपी’ १२ महिन्यांसाठी सुरु करावी व भविष्यातील परताव्याचा दर समाधानकारक वाटल्यास सुरु ठेवण्याचा निर्णय आपल्या गुंतवणूक सल्लागारांच्या मदतीने घ्यावा. थोडक्यात गांवात नवीन सुरु झालेल्या उपाहारगृहात पदार्थ चाखायला पहिल्यांदा जातो, चव आवडली तर वारंवार त्याला भेट देतो. तसेच एकदा गुंतवणूक करून पाहायला हरकत नाही पुढील एका वर्षांत परताव्याचा दर समाधानकारक वाटला तर एसआयपी सुरु ठेवावी.
फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार: गुंतवणुकीसाठी कायम खुला असलेला (ओपन एंडेड) समभाग गुंतवणूक (इक्विटी) फंड   
जोखीम प्रकार : समभाग गुंतणूक (करडा रंग)- जोखीमीची गुंतवणूक.      
फंडाच्या परताव्याच्या : एस अँड पी बीएसई २०० निर्देशांक तुलनेसाठी निर्देशांक             
निधी व्यवस्थापक : तब्बल २० वर्षांचा समभाग संशोधन व गुंतवणुकीचा अनुभव असलेले हर्षद पटवर्धन हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. ते जे पी मॉर्गन अ‍ॅसेट मॅनेजमेंट (इंडिया) कंपनीमध्ये २००६पासून कार्यरत आहेत. या आधी त्यांनी विविध म्युच्युअल फंड व दलाली पेढय़ांमध्ये तेल व वायू क्षेत्राचे समभाग विश्लेषक म्हणून काम केले आहे. ते आयआयटी, मुंबईचे बीटेक असून आयआयएम, लखनऊ येथून वित्तीय व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदविका घेतली आहे. तसेच ते सीएफए आहेत.
पर्याय    :    वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड)
फंड खरेदीची पद्धती    :    मोबाईल फोनद्वारे <एफावठऊ> टाइप करून 56767 वर एसएमएस पाठवा, कंपनीचा ग्राहक प्रतिनिधी संपर्क करेल.
नवीन फंड विक्री    :     १३ जानेवारी ते २७ जानेवारी २०१५ दरम्यान

आíथक आवर्तनाच्या दिशा बदलामुळे व सरकार करीत असलेल्या संरचनात्मक बदलांमुळे देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचा वेग वाढेल असा आमचा कयास आहे. आमच्या या फंडात या दोन गोष्टींच्या लाभार्थी असलेल्या कंपन्यांना स्थान देण्यात येईल. आमच्या मते भारतीय अर्थव्यवस्थेला जो दीर्घकालीन फायदा होणार आहे, या फायद्याचे लाभार्थी बनू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी आपली बचतीची या फंडात गुंतवणूक करावी. हा फंड दीर्घकालीन गुंतवणूकीतून भांडवली वृद्धी साधू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आदर्श पर्याय ठरावा.  
* हर्षद पटवर्धन
कार्यकारी संचालक व समभाग गुंतवणूक प्रमुख जेपी मोर्गन अ‍ॅसेट मॅनेजमेंट (इंडिया)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2015 1:01 am

Web Title: jpmorgan launches india economic resurgence fund
Next Stories
1 ‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’ कर्ते म्युच्युअल फंड
2 फंड विश्लेषण.. क्वांटम टॅक्स सेव्हिंग फंड
3 मास्तर.. कुटुंबाच्या सुरक्षिततेचे काय?
Just Now!
X