|| आशीष ठाकूर

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पापूर्वी जनमानसात करोनाच्या पाश्र्वभूमीवर ‘करोना कर’, वाढीव कर येण्याची भीती असताना प्रत्यक्षातील अर्थसंकल्पात कर रचने बाबतीत ‘जैसे थे’ असेच धोरण अवलंबल्याने व संपूर्ण अर्थसंकल्पात ‘वाईट बातमी नसणे हीच चांगली बातमी’ ठरल्याने सर्वांनीच सुस्कारा सोडला व बाजारातही तेजी अवतरली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवार चा बंद भाव :

सेन्सेक्स : ५०,७३१.६३

निफ्टी : १४,९२४.२५

गेल्या लेखातील ‘मंद झाल्या तारका’ मधील वाक्य होते – अर्थसंकल्प भांडवली बाजाराच्या पसंतीस उतरल्यास निर्देशांकांवर तेजी अवतरून निर्देशांक महत्त्वाच्या  केंद्रबिंदू स्तरावर म्हणजे सेन्सेक्सवर ४७,८०० आणि निफ्टीवर १४,००० च्या स्तरावर वाटचाल होऊन निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४९,२०० ते ४९,९०० आणि निफ्टीवर १४,४५० ते १४,७०० आणि द्वतीय लक्ष्य सेन्सेक्सवर ५०,६०० आणि निफ्टीवर १४,९०० असेल. सरलेल्या सप्ताहातील निर्देशांकांचा साप्ताहिक बंद हा बरोबर द्वितीय लक्ष्यावर सेन्सेक्सवर ५०,७३१ आणि निफ्टीवर १४,९२४ वर बंद होत वरील उताऱ्यातील शब्दन्शब्द निर्देशांकांनी आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणला. येणाऱ्या दिवसांत निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ५०,१८४ आणि निफ्टीवर १४,७५३ चा स्तर सातत्याने राखल्यास निर्देशांकाचे वरचेच लक्ष्य हे सेन्सेक्सवर ५२,००० ते ५२,१९६ आणि निफ्टीवर १५,२८० ते १५३३२ असेल. या लक्ष्यपूर्तीनंतर काहीशी घसरण संभवते व या घसरणीत निर्देशांकाचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ५०,१८४ ते ४९,१७८ आणि निफ्टीवर १४,७५३ ते १४,४६४ असेल. पुढील लेखात निर्देशांकाची खालची, वरची लक्ष्ये कशी काढली ते अवगत करून घेऊया.

टाटा स्टील लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल मंगळवार,९ फेब्रुवारी

५ फेब्रुवारी बंद भाव ६८५.१५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर ६४० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६४० रुपयांचा स्तर राखत,प्रथम वरचे लक्ष्य ७३० रुपये, द्वितीय लक्ष्य ७९० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ६४० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५९० रुपयांपर्यंत घसरण.

हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल बुधवार,१० फेब्रुवारी

५ फेब्रुवारी बंद भाव २६२ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर २४५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २४५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २७५ रुपये, द्वितीय लक्ष्य ३०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : २४५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत  २२५ रुपयांपर्यंत घसरण.

टायटन कंपनी लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल बुधवार, १० फेब्रुवारी

५ फेब्रुवारी बंद भाव १,५१०.०५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर १,४७५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,४७५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,५७५ रुपये, द्वितीय लक्ष्य १,६४० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १,४७५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,३५० रुपयांपर्यंत घसरण.

अशोक लेलँड लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल गुरुवार, ११ फेब्रुवारी

५ फेब्रुवारी बंद भाव १३१.७० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर १२५ रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १२५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १४५रु., द्वितीय लक्ष्य १६५रु.

ब) निराशादायक निकाल : १२५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १०५ रुपयांपर्यंत घसरण.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल शुक्रवार, १२ फेब्रुवारी

५ फेब्रुवारी बंद भाव २१८.९० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर २०० रु.

अ) उत्कृष्ट निकाल :समभागाकडून २०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २३५ रुपये, द्वितीय लक्ष्य २६५ रुपये.

ब) निराशादायक निकाल : २०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १८५ रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.