चालू आíथक वर्षांत ओळीने ११ महिन्यांत समभाग संलग्न म्युच्युअल फंडांच्या योजनांतील एकूण गुंतवणुकीत वाढ दिसून आली. उंचावणाऱ्या बाजार निर्देशांकांमुळे आकर्षक परताव्याच्या अपेक्षेने या योजनांतील नव्याने येत असलेला निधीचा ओघ जुन्याजाणत्या योजनांमध्ये वळला असतानाच गुंतवणूकदारांच्या बदलत्या मानसिकतेचा फायदा उठविण्यास म्युच्युअल फंड सिद्ध झाले आहेत. दर महिन्यात नवीन नवीन योजना खुल्या होत आहेत.
* एसबीआय डायनॅमिक अॅसेट अलोकेशन फंड: एका समयी समभाग अथवा रोख्यांत अगदी संपूर्ण १०० टक्के गुंतवणूक असणारा अनोखी ‘एसबीआय डायनॅमिक अॅसेट अलोकेशन फंड’ नावाची गुंतवणुकीसाठी कायम खुली असलेली योजना एसबीआय म्युच्युअल फंडाने दाखल केली आहे. २४ मार्चपर्यंत गुंतवणुकीसाठी खुल्या असलेल्या या योजनेचे वैशिष्टय़ म्हणजे समभाग, रोखे अथवा रोख हाती ठेवण्याची समर्पक निर्णयक्षमता राखणाऱ्या इन-हाऊस अलोकेशन मॉडेलवर आधारित पोर्टफोलियो बनविणाऱ्या रचनेचा तो देशातील पहिलाच प्रयोग असेल. दीर्घ मुदतीत जोखीम संतुलित परतावा देण्यासाठी ही रचना सर्वोत्तम मानली जाते. समभागलक्ष्यी अथवा बिगर समभागलक्ष्यी (डेट) असे योजनेचे वर्गीकरणही त्या त्या गुंतवणूक स्वरूपानुसार बदलणार असले तरी गुंतवणूकदारांना त्याचा करदायित्वासंबंधाने कोणताही भार येणार नाही, याचीही काळजी घेतली गेली आहे. योजनेच्या परतावा कामगिरीसाठी क्रिसिलच्या एक वर्षांच्या सीडी निर्देशांकाचा ५० टक्के अधिक सेन्सेक्स निर्देशांकाचे ५० टक्के असा एकत्रित मानंदड वापरात येणार आहे.
* आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इंडिया रिकव्हरी फंड सिरीज-१:
चालू आठवडय़ात फंड घराण्याच्या एकूण मालमत्तेच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर असलेले फंड घराणे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इंडिया रिकव्हरी फंड सिरीज-१ ही युनिट वाटप झाल्यापासून १२८६ दिवसांची मुदतबंद योजना ९ ते २३ मार्चदरम्यान गुंतवणूकदारांना खरेदीसाठी खुली राहणार आहे. मृणाल सिंग व रजत चंदक हे या योजनेचे अनुक्रमे निधी व्यवस्थापक व सह निधी व्यवस्थापक आहेत. या योजनेच्या एडीआर व जीडीआर गुंतवणुकीचे निधी व्यवस्थापक शाल्य शहा हे आहेत. या योजनेत ‘रेग्युलर’ अर्थात मध्यस्थामार्फत व ‘डिरेक्ट’ म्हणजे मध्यस्थ वगळून असे दोन विकल्प असून किमान गुंतवणूक पाच हजार रुपये व त्यानंतर दहा रुपयांच्या पटीत गुतंवणूक करता येईल. योजनेतून जमा झालेल्या निधीपकी किमान ऐंशी टक्के निधी समभागात व कमाल वीस टक्के निधी रोख्यात गुंतवण्यात येईल. ‘एस अॅन्ड पी बीएसई ५००’ हा निर्देशांक योजनेचा संदर्भ निर्देशांक आहे.
‘देशात सत्ताबदल झाल्याने धोरणात्मक बदल होऊन सरकारचे धोरण मोठय़ा पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे आहे. येत्या आठवडय़ात अर्थसंकल्पात प्रस्तावित असलेल्या बहुपदरी ५००० किलोमीटरच्या रस्त्यांच्या निविदाची जाहिरात प्रकाशित केली जाईल. सरकारच्या अशा संरचनात्मक बदलाच्या लाभार्थी असलेल्या कंपन्यांना आमच्या गुंतवणुकीत स्थान मिळेल’ असे या योजनेचे निधी व्यवस्थापक मृणाल सिंग यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
* एलआयसी नोमुरा बँकिंग फायनान्शियल सेक्टर फंड हा गुंतवणुकीस कायम खुला असलेला फंड ९ ते २३ मार्चदरम्यान गुंतवणुकीस खुला आहे. या फंडात जमा झालेला निधी दीर्घकालीन भांडवली नफा मिळविण्याच्या उद्देशाने खासगी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, गरबँकिंग वित्तीय कंपन्या, आíथक सेवा पुरविणाऱ्या कंपन्याच्या समभागात गुंतविला जाणार आहे. ‘एस अॅन्ड पी बीएसई बँकेक्स’ हा निर्देशांक योजनेचा संदर्भ निर्देशांक आहे. या फंडात किमान पाच हजार व एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केल्यास किमान एक हजाराने सुरू करता येईल. रामनाथ वेंकटेश्वरन हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Mar 2015 रोजी प्रकाशित
नवीन फंड योजना
चालू आíथक वर्षांत ओळीने ११ महिन्यांत समभाग संलग्न म्युच्युअल फंडांच्या योजनांतील एकूण गुंतवणुकीत वाढ दिसून आली.
First published on: 23-03-2015 at 07:54 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New fund scheme