सध्याच्या अनिश्चित आíथक परिस्थितीमध्ये व्यापक अशा मूलभूत तत्त्वाची प्रकर्षांने जाणीव होते. या जगात फुकट किंवा विनासायास काहीही प्राप्त होत नाही. काही तरी कमविण्यासाठी कशाची तरी किंमत मोजण्याची तयारी ठेवावी लागते. गुंतवणुकीच्या बाबतीतही तोच नियम लागू पडतो. जास्त प्रमाणात परतावा प्राप्त करून घ्यायची इच्छा असेल तर मोठय़ा प्रमाणातील धोका अंगीकारण्याची िहमत लागते. जास्तीत जास्त परतावा मिळविण्यासाठी प्रत्येक गुंतवणूकदाराला आपापल्या कुवतीप्रमाणे जोखीम आणि परतावा यामध्ये समतोल साधून गुंतवणुकीचे पर्याय निवडणे आवश्यक आहे, याची गेल्या भागामध्ये माहिती करून घेतली.
गुडघे फुटल्याशिवाय सायकल चालवता येत नाही, नाकातोंडात पाणी जाऊन जीव घुसमटल्याशिवाय पोहता येत नाही. तसेच पचनी पडेल इतपत थोडाफार फटका खाल्ल्याशिवाय गुंतवणुकीच्या क्षेत्रात प्रावीण्य मिळविता येत नाही. त्यासाठी प्रथम धोक्यांचे प्रकार माहीत करून घेणे आवश्यक आहे.
गुंतवणुकीच्या बाबतीत, ज्यातून कधीही सुटका करून घेता येत नाही असा सर्वात मोठा धोका म्हणजे भाववाढीचा धोका. आज आपल्याजवळ असलेल्या पशाची किंमत (purchasing power) भविष्यात भाववाढीमुळे कमी कमी होत जाते. सर्वसामान्य गुंतवणूकदार, ज्यांची बँक किंवा पोस्ट ऑफिस किंवा कंपन्यांच्या मुदत ठेवी म्हणजे सर्वात बिनधोक पर्याय अशी धारणा असते ते या भाववाढीच्या धोक्याचे बळी पडलेले असतात. कारण अशा प्रकारच्या गुंतवणुकींचा परतावा हा नेहमीच भाववाढीपेक्षा कमी असतो. जे गुंतवणूकदार वयाच्या पंचविशीपासून निवृत्तीपर्यंत फक्त याच प्रकारच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात त्यांची नंतर आíथक कुचंबणा होते. त्यांच्या हातून अनाहूतपणे सुसंधीचा धोका (opportunity risk‘) टाळण्याचा प्रकार होत असतो. कारण त्या वेळी त्याने एका दुसऱ्या एखाद्या पर्यायात उपलब्ध असलेली जास्त परताव्याची शक्यता गमावलेली असते.
सर्व गुंतवणूक एकाच प्रकारच्या म्हणजे शेअर किंवा एफडी (मुदत ठेवी) किंवा जमीनजुमला किंवा स्वत:चा व्यवसाय वगरेमध्ये केली की तेथे केंद्रीकरणाचा धोका (concentration risk)उद्भवतो. इंग्रजीमध्ये ‘एकाच बास्केटमधे सर्व अंडी ठेवणे’ असे म्हणतात तो हाच प्रकार.
गुंतवणुकीच्या बाबतीत आणखी एक धोका म्हणजे व्याजदर धोका (interest rate risk). याचा परिणाम सर्व प्रकारच्या गुंतवणुकांवर होत असतो. परंतु सर्वात जास्त प्रकर्षांने जाणवतो तो ठोस परताव्याच्या मुदत ठेवींवर. १९९१ ते १९९५ मध्ये व्याजाचे दर १५% ते १८% पर्यंत होते. आज ते १०% पेक्षा कमी आहेत. त्यामुळे ठोस परताव्यांच्या गुंतवणुकांपासून होणारी आवक ३३% पेक्षा जास्त प्रमाणात घटली आहे. त्याच प्रमाणात गुंतवणुकीच्या मूळ रकमेची बाजार किंमतही कमी झालेली आहे.
विश्वासार्हतेचा धोका म्हणजे आपण विश्वासाने गुंतविलेली मूळ रक्कम परत न मिळण्याचा धोका. हा धोका एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या बाबतीत उद्भवतो. ज्यांना ‘ब्लू चिप’ म्हटले जात होते अशा अनेक चांगल्या कंपन्या, भुदरगड सहकारी पतपेढी किंवा सहकारी बँका डबघाईला आल्या आणि एफडीची मूळ रक्कम परत करू शकल्या नाहीत, अशी अनेक उदाहरणे आहेत. तांत्रिकष्टय़ा पूर्णपणे सुरक्षित समजल्या जाणाऱ्या एनसीडीचे (राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे) पसेही बऱ्याच जणांना परत मिळालेले नाहीत.
आपल्याजवळील मालमत्ता विकून पसे रोख स्वरूपात परावर्तित करायची वेळ येते तेथे फेरविक्रीचा धोका (liquidity risk) होण्याची शक्यता असते. पशाची गरज असताना समोर कोणीही खरेदीदार नाही हा फार मोठा धोका असतो. बाजारभाव वेगळा असतो. परंतु आपली निकड पाहून समोरचा भाव पाडून व्यवहार करतो. अतिशय कमी प्रमाणात व्यवहार होतात असे शेअर, जमीनजुमला वगरेंच्या बाबतीत हा धोका जास्त असतो. एफडीच्या बाबतीतही मुदतपूर्व पसे हवे असतील तर दंड लागतो. म्युच्युअल फंडाचे युनिट किंवा शेअरच्या बाबतीत हा धोका कमी आहे. त्या दिवशीच्या खरेदी-विक्रीच्या दराप्रमाणे कोणत्याही कामकाजाच्या दिवशी विक्री करता येते. तिसऱ्या दिवशी पसे उपलब्ध होतात.
धोक्याच्या संदर्भातील सहिष्णुता
गुंतवणुकीच्या क्षेत्रातील नवशिक्यांच्या बाबतीत त्यांची एक ठाम समजूत असते. शेअर बाजारामधील गुंतवणूक ही अत्यंत धोकादायक असते. त्यातील अनपेक्षित तेजी-मंदीमुळे आपल्या गुंतवणुकीची वाताहत होते. त्यांचा समज काही प्रमाणात योग्यच आहे. ऑक्टोबर २००८ मधील एका शुक्रवारी (Black Friday) बीएसई आणि एनएसई या भारतातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये सुरुवातीच्या काही तासांमध्येच भावाची १०% पेक्षा जास्त घसरण झाली. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात प्रथमच दोन्ही बाजार काही काळ बंद ठेवावे लागले. या घसरणीला शेअर बाजार नाही तर गुंतवणूकदार आणि त्यांची अनाकलनीय मनोवृत्ती जबाबदार आहे. माझा अनुभव म्हणाल तर अशा परिस्थितीत, किंबहुना नेहमीच, बहुतांशी गुंतवणूकदार असंयुक्तिक वागतात. तेजीच्या पराकोटीला खरेदीचे सौदे जास्त असतात. ज्यांचा सर्वसाधारणपणे शेअर बाजाराशी संबंध नसतो असे गुंतवणूकदारही कोणाच्या तरी सांगण्यावरून (टीप) काही तरी खरेदी करतात. याउलट मंदीच्या शेवटाला विक्रीचे सौदे जास्त असतात. तेजीमध्ये चढय़ा भावाने घेतलेले शेअर हे गुंतवणूकदार विकून मोकळे होतात, नुकसान भोगतात आणि शेअर बाजाराला नाव ठेवतात. पुढील तेजीमध्ये याचीच पुनरावृत्ती होते. गुंतवणुकीमधील धोक्यावर मात करून सहिष्णुता वाढवायची असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे. गुंतवणुकीचा कालावधी आणि शिस्त. जर तुमच्याकडे कमीतकमी १० वर्षांचा कालावधी असेल, ज्या काळामध्ये तुमच्या गुंतवणुकीमध्ये वाढ होईल आणि त्यात अनावश्यक ढवळाढवळ न करण्याची शिस्त असेल तर शेअर बाजारासारखा परतावा तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही पर्यायात मिळणार नाही.
गुंतवणूकीसंदर्भात धोक्याबाबतची सहिष्णुता आणि धोका पत्करायची पातळी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जास्त परताव्याच्या गुंतवणुकीच्या पर्यायात त्या त्या प्रमाणात अनिश्चितता असते. गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीच्या बाबतीत किती प्रमाणात अनिश्चितता सहन करू शकतो किंवा वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे ज्या प्रकारच्या गुंतवणुकीमुळे त्याच्या रात्रीच्या झोपेवर परिणाम होत नाही ती त्याची धोक्याबाबतची सहिष्णुता!
आíथक ध्येय साध्य करण्यासाठी गुंतवणूकदाराला काही प्रमाणात जोखीम ही पत्करावीच लागते. आपल्या जवळील कालावधी, रक्कम आणि अंतिम ध्येय या गोष्टींचा विचार करून आपल्याला किती प्रमाणात परताव्याची गरज आहे ते जाणून घ्यावे लागते. त्या पर्यायामधील जोखीम ही त्या गुंतवणूकदाराची धोक्याची पातळी.
स्वत:च्या बाबतीतील धोक्याच्या संदर्भातील सहिष्णुता जाणून घेण्याचे सद्धांतिक प्रमाण आणि त्यानुसार आपली कोणत्या प्रकारच्या गुंतवणूकदारांमध्ये गणना केली जाते ते पुढील भागामध्ये पाहू या.
लेखक गुंतवणूक आणि विमा सल्लागार

ऑक्टोबर २००८ मधील एका शुक्रवारी (ब्लॅक फ्रायडे) बीएसई आणि एनएसई या भारतातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये सुरुवातीच्या काही तासांमध्येच भावाची १०% पेक्षा जास्त घसरण झाली. त्यावर नियंत्रण म्हणून दोन्ही बाजार काही काळ बंद ठेवावे लागले. या घसरणीला शेअर बाजार नाही तर गुंतवणूकदार आणि त्यांची अनाकलनीय मनोवृत्ती जबाबदार आहे. अशा परिस्थितीत, किंबहुना नेहमीच, बहुतांशी गुंतवणूकदार असंयुक्तिक वागतात.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…