बहुतांशी व्यक्तींच्या बालपणीच्या अनुभवांचा त्यांच्या आíथक वर्तनावर परिणाम असतो. वयाच्या १२व्या वर्षांपर्यंत आशा, इच्छाशक्ती, ध्येय आणि सक्षमता हे व्यक्तिमत्त्व गुण विकसित होतात. तरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे मग ते सामान्य व्यक्तिमत्त्व असो किंवा आíथक व्यक्तिमत्त्व..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील भागात आपण बालपण आणि आíथक व्यक्तिमत्त्व याविषयी काही प्रश्नासंबंधी चर्चा केली होती. या भागात आपण बालपणीचे आíथक व्यक्तिमत्त्वावरील परिणाम आणि त्यांविषयी काही उपाय पाहणार आहोत. असा काही नियम नाही की सर्वाच्याच आíथक व्यक्तिमत्त्वावर बालपणीच्या अनुभवाचाच संपूर्ण परिणाम असेल पण बहुतांशी व्यक्तींच्या बालपणीच्या अनुभवांचा त्यांच्या आíथक वर्तनावर परिणाम असतो.

मनोवैज्ञानिक एरिक एरिकसन याने संशोधनाने व्यक्तिमत्त्व विकासाच्या अवस्था सांगितल्या आहेत. त्याच्या मते जन्मल्यापासूनच व्यक्तिमत्त्व घडण्यास सुरुवात होते. वयाच्या १२व्या वर्षांपर्यंत आशा, इच्छाशक्ती, ध्येय आणि सक्षमता हे व्यक्तिमत्त्व गुण विकसित होतात. व्यक्तिमत्त्वासंबंधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे मग ते सामान्य व्यक्तिमत्त्व असो किंवा आíथक व्यक्तिमत्त्व. यामध्ये दोन भाग पडतात.

१.     बालपणी आíथक व्यक्तिमत्त्वावर झालेले परिणाम आणि ते बदलण्यासाठी करावयाचे उपाय.

२.     पालक म्हणून पाल्याच्या बालपणी आíथक व्यक्तिमत्त्वासंबंधी घ्यावयाच्या काळजी.

यातील आज आपण पहिला भाग पाहणार आहोत.

बालपणी आíथक व्यक्तिमत्त्वावर झालेले परिणाम आणि ते बदलण्यासाठी करावयाचे उपाय चाचपताना, बालपणीच्या आíथक व्यक्तिमत्त्वासंबंधी भावना आणि समजुती या गोष्टी तपासून त्यासंबंधी जागरूक होणे गरजेचे आहे.

भावना..

आपल्या बालपणी पशांसंबंधी कोणती भावना प्रमुख होती? आनंद, दु:ख, भीती किंवा राग हे आठवून पाहा. कारण समजा एखाद्या गोष्टीमुळे, व्यक्तीमुळे किंवा परिस्थितीमुळे एखाद्या व्यक्तीला दु:ख, भीती किंवा राग या भावना येत असतील तर त्या व्यक्तीचा अशा गोष्टी, व्यक्ती आणि परिस्थितीपासून दूर राहण्याचा अथवा ती टाळण्याकडे कल असेल. समजा, अशीच भावना पशांसंबंधी असेल तर ती व्यक्ती पशांसंबंधी असेच वर्तन ठेवील. त्यामुळे आíथक बाबी या आनंदाशी संबंधित असतील तर आíथक व्यक्तिमत्त्वासाठी फायद्याचे ठरते, हे समजणे गरजेचे असते. कारण दु:ख, भीती किंवा राग या भावना समस्या नाही तर ती एक सवय बनते. उदाहरणार्थ, आपण यशस्वी होऊ की नाही? आपल्याकडे पुरेसा पसा असेल की नाही? याची एखाद्याला भीती सतावत राहते. पण त्याच व्यक्तीला पसा मिळाल्यावर कमवलेला पसा गेला तर काय? याची भीती वाटत राहते. त्यामुळे बालपणी आíथक बाबतीत कोणत्या भावनांचा खोल परिणाम आहे हे कळणे गरजेचे आहे.

नकारात्मक भावना जर सकारात्मक भावनांनी जर बदलण्याची सवय लावून घेतली तर त्याचा आíथक दृष्टिकोनावर सकारात्मक परिणाम होतो. पसा आपल्याला आíथकदृष्टय़ा स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि आनंद देणारी गोष्ट आहे असा आपण विचार करू आणि कृती करू तेव्हा आपल्या भावनिकतेमध्ये बदल होतो ज्याचा आपल्या आíथक व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो. त्यामुळे भावना या दिशादर्शकाप्रमाणे कार्य करीत असतात.

समजुती..

पशांविषयी बालपणी आपल्या समजुती कोणत्या होत्या हे तपासणे खूपच गरजेचे आहे. जसे –

  • पसा बचतीसाठी असतो
  • पसा सुरक्षिततेसाठी असतो
  • पसा खर्च करण्यासाठी असतो
  • पसा गुंतवणुकीसाठी असतो
  • पसा प्रतिष्ठेसाठी असतो
  • पसा कर्ज आणि लोकांची देणी मिटवण्यासाठी असतो
  • पसा चनीसाठी असतो इत्यादी

उदाहरणार्थ, समजा एखाद्याला लहानपणी हाती असलेला सर्व पसा खर्च करण्याची सवय आपल्या पालकांकाढून घेतली असेल तर? आणि त्याची ती समजूत असेल तर? मग लहानपणी पाच रुपये दिल्यानंतर तो/ती सर्वच्या सर्व पसे खर्च करूनच घरी परतत असेल. तर नंतर नंतर तो महिन्याला लाख रुपये जरी कमावू लागला तर तो सर्व पसा खर्च करण्यासाठी माध्यम शोधून ठेवील. महिनाअखेर सर्व पसे खर्च करण्याची सवय बनेल आणि त्याच्याकडे कधीच पसे बचतीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी शिल्लक राहणार नाहीत. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा तो साचा (पॅटर्न) बनेल. अशी व्यक्ती आपल्या वागण्याचे समर्थन करण्यासाठी व आपले वागणे कसे बरोबर आहे हे इतरांना समजावून सांगण्यासाठी तर्क शोधत राहील आणि त्याच प्रकारे वागत राहील. त्या व्यक्तीचे खर्च करणारे आíथक व्यक्तिमत्त्व तयार होईल. सुप्त मनावर अशा समजुतींचा खोल परिणाम होतो. उदाहरण जसे काही जण म्हणतात की, आपण पशांचा जास्त विचार करीत नाही. पसा आज आहे उद्या नाही. आयुष्यात कायम मजा करत राहायची इ.

मार्ग काय?

आपल्या आíथक व्यक्तिमत्त्वाच्या बालपणीच्या साचातून (पॅटर्न) बाहेर पडून आíथक व्यक्तिमत्त्व बदलण्यासाठी नवीन विचार, भावना, कृती आणि त्यायोगे सवयी व व्यक्तिमत्त्व बदलता येऊ शकते. जर व्यक्तिमत्त्व बचतीचे किंवा गुंतवणुकीचे असेल तर ते वृिद्धगत करता येते. आíथक व्यक्तिमत्त्व एका दिवसात बनत नाही, तसेच ते एका दिवसांत बदलताही येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला आíथक व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल किंवा विकसित करायचे असेल तर आधी सध्याचे व्यक्तिमत्त्व समजले पाहिजे आणि ज्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व बनवायचे असेल त्यानुसार आíथक विचार, भावना, कृती आणि सवयी बदलून आíथक व्यक्तिमत्त्व बदलता येते. उदाहरणार्थ, पसा खर्च करण्याची सवय असणाऱ्याला आपले व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल आणि पशाची गुंतवणूक शिकायची असेल तर त्यानुसार गुंतवणुकीविषयी अभ्यास मार्गदर्शनाने सतत विचार आणि कृती केली पाहिजे. मग त्याची सवय लागली की व्यक्तिमत्त्व बदलता येऊ शकते. त्यामुळे काळजीपूर्वक नेमके आíथक व्यक्तिमत्त्व निवडून त्या पद्धतीने सवय लावून घेणे गरजेचे असते. पुढील भागात पालक म्हणून पाल्याच्या बालपणी आíथक व्यक्तिमत्त्वासंबंधी घ्यावयाच्या काळजी या विषयी पाहू.

वाचकांनी त्यांच्या अमूल्य प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात.

kiranslalsangi@gmail.com

लेखक पुणेस्थित समुपदेशक आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Psychology of financial literacy
First published on: 04-04-2016 at 02:08 IST