5मागील अभ्यास वर्गामध्ये आपण लॉंग. स्ट्राडल (Long Straddle) व लॉंग स्ट्रान्गल (long strangle) डावपेच वापरावेत हे शिकलो. आजच्या वर्गामध्ये निर्णय लागून संभ्रमता नष्ट होत असल्यास काय करावे इत्यादी डावपेचांचा अभ्यास करणार आहोत. 

जेव्हा एखादी मोठी घटना जसे निवडणुका, सर्वोच्च न्यायालयाचा एखादा महत्त्वपूर्ण निर्णय, कंपनींचे वार्षकि तिमाही ताळेबंध इत्यादी होऊन गेले असल्यास किंवा आता निकाल लागत असल्यास तेव्हा खालील डावपेच वापरावेत. महत्त्वाची घटना झाली असल्याने बाजारात / शेअर्समध्ये संभ्रम व अनिश्चितता तात्काळ कमी व्हायला लागेल व त्यामुळे कॉल व पूटचे अधिमुल्य कमी होईल.
काही वेळा शेअर्सचा भाव वाढत असतानासुद्धा कॉलचा भाव वाढत नाही किवा शेअर्सचा भाव खाली पडत असतानासुद्धा पूटचा भाव वाढत नाही. या संकल्पनेला अस्थिरता अंत (volatility crunch) असे म्हणतात. यामध्ये घटना संपताना ध्वनित अस्थिरता (implied volatility) अचानक मोठय़ा प्रमाणात कमी होते व विकल्पांच्या बाह्यभूत (Time Value) किंमतीमध्ये अचानक मोठय़ा प्रमाणात ऱ्हास होतो. ही संकल्पना माहित नसल्याने अनेक निष्णात व तज्ज्ञ विकल्प ट्रेंडर्सनासुद्धा तोटा सहन करावा लागला आहे. त्यामुळे अनेक लोकांना असा प्रश्न पडत असतो, की शेअर्सचे भाव वाढत असताना माझा कॉल का वाढला नाही किंवा शेअर्स पडत असताना माझ्या पूटचा भाव का वाढला नाही?
शक्यतो घटना संपताना ध्वनित अस्थिरतेचा (implied volatility) अभ्यास करावा ही गोष्ट तुलनात्मक आहे. स्वतंत्र शेअर्ससाठी आय व्ही ४० च्या वर असल्यास व निफ्टीसाठी आय व्ही २० च्या वर असल्यास आय व्ही जास्त आहे, असे समजले जाते. अर्थात हे तुलनात्मक आहे, हेही लक्षात ठेवावे व घटना संपली किंवा नजीकच्या वेळी सदर डावपेच वापरावेत. कृपया या डावपेचांमध्ये दोन्ही विकल्प विकणार असल्याने सर्वात मोठा धोका अमर्याद तोटा हा आहे. ट्रेड सुरू असताना कशाा्रकारे ट्रेडमध्ये बदल करावे हा अनुभवाचा भाग आहे. त्याच वेळी निकाल लागण्याचा म्हणजेच घटनेच्या वेळेला खूप महत्व आहे.

mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Loksatta kutuhal Artificial Neural Networks Perceptrons Machine learning
कुतूहल: कृत्रिम चेतापेशींचे जाळे
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

3केव्हा वापरावे?
जेव्हा महत्त्वाचे निर्णय लागताक्षणी, जेव्हा संभ्रम अवस्था प्रचंड असल्यामुळे कॉल व पुट चे भाव प्रचंड वाढलेले आहेत व आता निकाल लागल्यामुळे ती संभ्रमता संपणार असून ध्वनित अस्थिरता (implied volatility) कमी होऊन ऑपशन्सचे भाव कमी होणार आहेत; परंतु बाजार / शेअर्स वर जाईल की खाली जाईल हे समजत नसल्याने अशावेळी सदर डावपेच वापरावेत किवा बाजार / शेअर्स रेंजबॉन्ड , साइडवेजमध्ये जाणार असे वाटल्यास सदर डावपेच वापरावेत.

काय करावे?
बाजार भावाजवळचा ए टी एम कॉल व पुट दोन्ही विकावे. म्हणजे शॉर्ट स्ट्राडल (Short Straddle) करावा वा किंवा बाजार भावाच्या दूरचा म्हणजेच ओ टी एम कॉल व ओ टी एम पुट दोनीही विकावे म्हणजे शॉर्ट स्ट्रान्गल (Short Straddle) विकावे.
खर्च : नाही
तोटा : अमर्याद
नफा : दोन्ही बाजूचे मिळालेले प्रिमीअम हा जास्तीत जास्त फायदा.

4बाहेर केव्हा पडावे :
बाजार / शेअर्स जेव्हा कोणत्यातरी एका दिशेने वेगाने जात असल्यास तात्काळ बाहेर पडावे. कारण कॉल किवा पुटचा तोटा अमर्याद राहणार आहे किवा अगोदरच ठरवलेला तोटा किंवा फायदा झाल्यास बाहेर पडावे.
डावपेचांचे फायदे :
संभ्रम अवस्थेमुळे कॉल किंवा पूट दोघांचेही प्रिमिअम वाढलेले असल्याने तेव्हा विकल्प जास्त किंमतीला आपणास विकायला मिळतील आय व्हीमध्ये घसरण होणार असल्याने त्याचा फायदा मिळेल. कॉल व पूट दोघांमध्ये ऱ्हासाचा फायदा मिळेल. फक्त बाजार/शेअर्स एकंदर मिळकतीपेक्षा जास्त दूर कोणत्याही एका दिशेने बाजार / शेअर्स जावू नये. एक अंग म्हणजे कॉल किवा पूट खरेदी करून बाहेर व्हावे व दुसरा विकल्पामध्ये नफा वाढवत रहावा.
उदाहरणार्थ :
मी ६ मे २०१५ रोजी हेवल्स इंडिया लिमिटेड या शेअर्सचा अभ्यास करतो. कारण हेवल्स इंडिया लिमिटेडचा तिमाही ताळेबंद ११ मे २०१५ ला जाहीर होणार आहे. निकाल कसा राहील हे मला माहित नाही व निकालाच्या परिणामाला बाजार कसा प्रतिसाद देतो हेही मला माहित नाही. कारण निकाल चांगला असूनही त्या शेअर्सचे भाव कमी झालेले आपण बघितले आहेत. त्यामुळे माझा अंदाज तटस्थ (Neutral) आहे; पण ११ मे २०१५ रोजी निकाल लागताक्षणी संभ्रमता संपुष्टात येणार आहे हे नक्की. मी डेल्टा, थिटा, गॅमा, वेगा इत्यादीचा अभ्यास केला. ११ मे २०१५ ला प्रत्यक्ष भाव कसे असतील हे मला माहित नाहीत. त्यामुळे केवळ संकल्पना समजून घ्या. खालील माहिती ६ मे २०१५ रोजी असलेल्या भावांच्या अंदाजावरून घेतलेले आहेत. समजा हेवल्स इंडिया लिमिटेडचा बाजारभाव ११ मेट २०१५ रोजी रु. २८० आहे. जर रु. २८० च्या स्ट्राईकचा कॉल व पूट विकला तर त्या डावपेचाला स्ट्राडल विक्री म्हणू व रु ३०० च्या स्ट्राईकचा कॉल व २६० चा पूट विकला तर त्या डावपेचाला आपण स्ट्रान्गल विकणे (short strangle) म्हणू. मी स्ट्राडल (straddle) किवा स्ट्रान्गल (strangle) विकू शकतो. स्ट्राडल (straddle) पेक्षा स्ट्रान्गल (stangle) मध्ये अधिमुल्य कमी असल्याने मिळकत कमी होईल; पण दूरचे जवळपास ७% दूर असल्याने अमर्याद नुकसान होण्याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे स्ट्रान्गल (strangle) विकण्याचा निर्णय घेतला.
(विशेष सूचना : लेखातील चालू बाजारातील शेअरचे उदाहरण केवळ संकल्पना समजून सांगण्यासाठी घेतलेले आहे. कृपया वाचकांनी हा लेखकाने दिलेला सल्ला अथवा खरेदीची शिफारस आहे असे समजू नये. तथापि योग्य सल्लागाराकडून मार्गदर्शन घेऊनच व्यवहार करावा.)
info@primetechnicals.com