26 October 2020

News Flash

बाजाराचा तंत्र कल : लाभ – लोभ!

जेव्हा लाभाचे पर्यवसान लोभात होते तेव्हा ते विनाशास कारणीभूत ठरते

आशीष ठाकूर

निफ्टी निर्देशांक ९,००० पातळीवर असताना, गुंतवणूकदारांना खरेदीला प्रवृत्त केले गेले आणि जेव्हा निफ्टी निर्देशांकाने १०,००० चे वरचे लक्ष्य गाठल्यावर, याच गुंतवणुकीची नफारूपी विक्रीची शिफारस करून जो नफा कमावला त्याला ‘लाभ’ म्हणतात.

आता हीच प्रक्रिया निफ्टी निर्देशांक १०,००० च्या वर असताना तेजीची भव्यदिव्य स्वप्ने दाखवून, गुंतवणूकदारांना अक्षरश: भरीला टाकून जी गुंतवणूक होते त्याला ‘लोभ’असे म्हणतात.

जेव्हा लाभाचे पर्यवसान लोभात होते तेव्हा ते विनाशास कारणीभूत ठरते. हे सरलेल्या सप्ताहातील निर्देशांकाच्या घातक उतारातून आपण अनुभवले. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ३३,७८०.८९

निफ्टी : ९,९७२.९०

अमेरिकेतील भांडवली बाजारात सरलेल्या सप्ताहातील गुरुवारी डाऊ जोन्सवर १,८५० अंशांची घसरण झाली. याचे असा इशारेवजा भाकीत – ‘रोम जळत असताना निरो फिडेल वाजवत बसलाय. तेव्हा सावध व्हायची गरज आहे’, असे गेल्या सोमवारच्या लेखात केले होते. त्यानंतर घडलेही तसेच. तेथे आणि येथे दोन्हीकडे बाजारात जबरदस्त घसरण येऊन निर्देशांकांनी आपले खालचे लक्ष्य सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारच्या आरंभी सत्रातच सेन्सेक्सवर ३२,३४८ आणि निफ्टीवर ९,५४४ चा नीचांक नोंदवत साध्य केले.

निर्देशांकांवर एक घसरण – सेन्सेक्स ३४,८०० वर आणि निफ्टी १०,३०० वर असल्यापासून अपेक्षित होती. ती घसरण सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारच्या आरंभीच्या व्यवहारांमध्ये येऊन गेली.

येणाऱ्या दिवसात निर्देशांकांनी सेन्सेक्सवर ३२,९०० ते ३३,९०० आणि निफ्टीवर ९,६०० ते ९,९०० च्या स्तरावर पायाभरणी केल्यास या तेजीचे प्रथम वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३६,००० आणि निफ्टीवर १०,५५० असे असेल. त्या नंतरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ३८,२०० आणि निफ्टीवर ११,१५० असे असेल.

ही वरील उद्दिष्टे गाठण्यासाठी बाजाराची वाटचाल जेवढय़ा संथ गतीने होईल,     तेवढी नंतरची अपेक्षित तेजी ही आश्वासक असेल.

लाभ आणि लोभ या दोन शब्दांत फक्त एका मात्रेमुळे फरक आहे. आपण या ‘मात्रा’ असलेल्या शब्दापासून जेवढे दूर राहू तेवढे बाजाराच्या घातक चढ-उतारात आपल्याला औषधांची मात्रा कमी लागेल.

आगामी तिमाही निकालांचा वेध..

१) आयजीएल लिमिटेड       

’ तिमाही निकाल – सोमवार, १५ जून

’ १२ जूनचा बंद भाव –               रु. ४८३.७५

’  निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४६० रुपये.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५०० रुपये. भविष्यात ४६० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ५५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ४६० ते ५०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल

क) निराशादायक निकाल : ४६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४१५ रुपयांपर्यंत घसरण

२) फायझर लिमिटेड

’ तिमाही निकाल – सोमवार, १५ जून

’ १२ जूनचा बंद भाव – रु. ४,०६१.५५

’  निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर –       ४,००० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४,३०० रुपये. भविष्यात ४,००० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ४,५०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : ४,००० ते ४,३०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : ४,००० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,८०० रुपयांपर्यंत घसरण.

३) टाटा मोटर्स लिमिटेड

’ तिमाही निकाल – सोमवार, १५ जून

’  १२ जूनचा बंद भाव – रु. १०५.२५

’ निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १०० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १२० रुपये. भविष्यात १०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १३५ रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : १०० ते १२० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : १०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत  ८० रुपयांपर्यंत घसरण.

४) एफडीसी लिमिटेड

’  तिमाही निकाल – बुधवार, १७ जून

’  १२ जूनचा बंद भाव – रु. २४२.६०

’ निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर –   २४० रुपये

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २४० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २७० रुपये. भविष्यात २४० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ३०० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.

ब) सर्वसाधारण निकाल : २४० ते २७० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.

क) निराशादायक निकाल : २४० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २१० रुपयांपर्यंत घसरण.

* लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ashishthakur1966@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 1:04 am

Web Title: technical analysis of stock market stock market analysis zws 70
Next Stories
1 क.. कमॉडिटीचा : शेतमाल व्यापार अध्यादेश.. शेतकऱ्यांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ संधी
2 बंदा रुपया : गुणवत्तेचे चीज
3 माझा पोर्टफोलियो : बहुविधता, बहुबलाढय़ता!
Just Now!
X