 भारत फोर्ज ही कल्याणी समूहाची ध्वजा सबंध जगात फडकावणारी प्रमुख कंपनी. कािस्टग आणि फोर्जिग व्यवसायात ही कंपनी असून तिची बहुतांश उलाढाल वाहन उद्योगावर अवलंबून आहे. गेली दोन- तीन वष्रे जागतिक मंदीमुळे वाणिज्य वाहनांची  विक्री मंदावली होती आणि म्हणून कंपनीच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झाला होता. मात्र यंदाच्या वर्षांपासून या उद्योगात सुधारणा दिसून येत आहे. त्याचे परिणाम पहिल्या तिमाहीच्या निकालात दिसत आहेत. जून २०१४ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात २४.८% वाढ होऊन तो ७९१.५ कोटींवरुन ९८८.१० कोटींवर
भारत फोर्ज ही कल्याणी समूहाची ध्वजा सबंध जगात फडकावणारी प्रमुख कंपनी. कािस्टग आणि फोर्जिग व्यवसायात ही कंपनी असून तिची बहुतांश उलाढाल वाहन उद्योगावर अवलंबून आहे. गेली दोन- तीन वष्रे जागतिक मंदीमुळे वाणिज्य वाहनांची  विक्री मंदावली होती आणि म्हणून कंपनीच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झाला होता. मात्र यंदाच्या वर्षांपासून या उद्योगात सुधारणा दिसून येत आहे. त्याचे परिणाम पहिल्या तिमाहीच्या निकालात दिसत आहेत. जून २०१४ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात २४.८% वाढ होऊन तो ७९१.५ कोटींवरुन ९८८.१० कोटींवर  गेला आहे. तर नक्त नफ्यात ६०% अशी दणदणीत वाढ होऊन तो ९०.६ कोटींवरुन १४५ कोटी रुपयांवर गेला आहे. व्यवस्थापनाने दिलेल्या अधिकृत निवेदनाप्रमाणे कंपनीने संशोधन करून अनेक नवीन उत्पादने तयार केली आहेत तर काही उत्पादनात सुधारणा केल्या आहेत. यंदाच्या आíथक वर्षांसाठी कंपंनीकडे सर्वच उत्पादनांसाठी मोठय़ा ऑर्डर्स असून त्यात भारताच्या तुलनेत परदेशांतील मागणी जास्त आहे. आपल्याकडेही आता वाहन उद्योगांत सुधारणा दिसू लागल्याने येत्या दोन वर्षांत भारत फोर्ज उत्तम कामगिरी करून दाखवेल असा विश्वास वाटतो. सध्या ४०च्या वर किंमत/उत्पन्न (पी/ई) गुणोत्तर असलेला हा शेअर थोडासा महाग वाटला तरीही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी (किमान दोन वर्षांसाठी) हा तुमच्या पोर्टफोलिओत ठेवाच.
गेला आहे. तर नक्त नफ्यात ६०% अशी दणदणीत वाढ होऊन तो ९०.६ कोटींवरुन १४५ कोटी रुपयांवर गेला आहे. व्यवस्थापनाने दिलेल्या अधिकृत निवेदनाप्रमाणे कंपनीने संशोधन करून अनेक नवीन उत्पादने तयार केली आहेत तर काही उत्पादनात सुधारणा केल्या आहेत. यंदाच्या आíथक वर्षांसाठी कंपंनीकडे सर्वच उत्पादनांसाठी मोठय़ा ऑर्डर्स असून त्यात भारताच्या तुलनेत परदेशांतील मागणी जास्त आहे. आपल्याकडेही आता वाहन उद्योगांत सुधारणा दिसू लागल्याने येत्या दोन वर्षांत भारत फोर्ज उत्तम कामगिरी करून दाखवेल असा विश्वास वाटतो. सध्या ४०च्या वर किंमत/उत्पन्न (पी/ई) गुणोत्तर असलेला हा शेअर थोडासा महाग वाटला तरीही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी (किमान दोन वर्षांसाठी) हा तुमच्या पोर्टफोलिओत ठेवाच.
  संग्रहित लेख, दिनांक 18th Aug 2014 रोजी प्रकाशित  
 यांत्रिकी गुणवत्ता
भारत फोर्ज ही कल्याणी समूहाची ध्वजा सबंध जगात फडकावणारी प्रमुख कंपनी. कािस्टग आणि फोर्जिग व्यवसायात ही कंपनी असून तिची बहुतांश उलाढाल वाहन उद्योगावर अवलंबून आहे.
  First published on:  18-08-2014 at 01:01 IST  
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat forge ltd share iformation