फंडाविषयक विवरण
फंडाचा गुंतवणूक प्रकार : रोखे गुंतवणूक
जोखीम प्रकार : रोखे गुंतवणूक असल्याने मुद्दलाची शाश्वती. (निळा रंग धोका कमी- खात्रीशीर परतावा नव्हे! )
गुंतवणूक : या फंडाची पहिली एनएव्ही ३ नोव्हेंबर २००८ रोजी जाहीर झाली. तेव्हापासून या फंडाने ८.०२ टक्के परतावा दिला आहे. हा ‘मिडियम टर्म’ प्रकारचा फंड असून मध्यम व अल्प मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करणारा फंड आहे. हा फंड तीन ते पाच वष्रे मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करतो. गुंतवणूक केल्यापासून एका वर्षांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास एक टक्का निर्गमन अधिभार आकारण्यात येतो. या फंडाच्या परताव्याची तुलना करण्यासाठी ५० टक्के क्रिसिल शॉर्ट टर्म बॉंड इंडेक्स + ५० टक्के क्रिसिल कम्पोझिट बॉंड फंड इंडेक्स हे सूत्र आकारण्यात येते.
फंड गंगाजळी : ताज्या गुंतवणूक विवरणाप्रमाणे (Fund Factsheet) या फंडाची मालमत्ता १,९७६ कोटी रुपये आहे.
निधी व्यवस्थापक : धवल दलाल हे सुरवातीपासून म्हणजे नोव्हेंबर २००८ पासून फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. ते तत्कालीन डीएसपी मेरिल िलचमध्ये १९९६ मध्ये दाखल झाले. ते डलास विद्यापीठाचे व्यवस्थापन विषयाचे पदव्युत्तर पदवीधर असून डीएसपी मेरिल िलचमध्ये सुरुवातीच्या दिवसांत पीएमएस विभागात स्थिर उत्पन्न गुंतवणूक जबाबदाऱ्या पार पाडत असत. त्यांना एकूण १४ वर्षांचा स्थिर उत्पन्न गुंतवणुकीचा अनुभव आहे.
गुंतवणूक पर्याय : वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड : पे आउट व रिइंव्हेंस्ट)
फंड खरेदीची पद्धत : ०२२-६६१७८००० या क्रमांकावर सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत संपर्क केल्यास कंपनीचा गुंतवणूकदार सेवा प्रतिनिधी संपर्क करेल. तसेच फंडाच्या विक्रेत्यामार्फत किंवा थेट खरेदीसाठी http://www.dspblackrock.com या संकेतस्थळावर जाता येईल.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jun 2015 रोजी प्रकाशित
डीएसपी ब्लकरॉक इन्कम अपॉच्र्युनिटी फंड
या फंडाची पहिली एनएव्ही ३ नोव्हेंबर २००८ रोजी जाहीर झाली. तेव्हापासून या फंडाने ८.०२ टक्के परतावा दिला आहे.
First published on: 22-06-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dsp blackrock income opportunities fund