बाराव्या पंचवार्षकि योजनेला प्रारंभ झाला. बाराव्या पंचवार्षकि योजनेच्या अनेक उद्दिष्टांपकी कृषी क्षेत्रासाठी ६५० लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या उद्दिष्टांचा एक भाग म्हणून ५,३०,००० कोटींची तरतूद जलसिंचनासाठी करण्यात आली असून २,३०,००० कोटी जलव्यवस्थापनावर खर्च होणार आहेत. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. या योजना मुख्यत्वे पाण्यचा अपव्यय टाळून योग्य नियोजनासाठी आहेत.
कर्म तसे फळ लाभते केवळ आणिकांते बोल लावूं नये पेरोनियां साळी गव्हाचे तें पिक घ्यावया नि:शंक धावूं नये उत्तरा सारखे येते प्रत्युत्तर करावा विचार आपणासी पहावे ते दिसे दर्पणी साचार आपुला आचार ओळखावा स्वामी म्हणे होसी सर्व थव जाण तूझा तू कारण सुख-दु:खा – स्वामी स्वरूपानंद
सत्पुरुष नेहेमीच रोजच्या जीवनात कसे आचरण असावे याचे मार्गदर्शन करत असतात. या अभंगातून नाथ संप्रदायातील अधिकारी सत्पुरुष स्वामी स्वरूपानंद, हे ‘जैसे कर्म तसे फळ लाभते केवळ हा विचार तीन दृष्टांत देऊन सांगत आहेत.
लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होतील त्याच्या जवळपास नवीन उच्चांक दिसेल असे विधान १० जूनच्या स्तंभातून व्यक्त केले होते व इंडेक्स फंड हा पर्याय निवडावा अशी शिफारस केली होती. सेन्सेक्सचे सर्वकालीन शिखर चार-सहा महिने आधीच दिसले. विचारच्या दिव्यात आचाराचे तेल घातले तरच प्रकाश पडतो (विनोबा भावे). ज्यांनी कोणी विचाराला आचाराची जोड दिली त्यांनाच या शिखरावर नफा वसुली करण्याचा अधिकार आहे. म्हणून ‘कर्म तसे फळ लाभते केवळ’ हे जीवनातील शाश्वत सत्य बाजारालाही लागू पडते. जून – ऑगस्ट या काळात जे कोणी शेअर खरेदी
करण्यास धजावले त्यांनाच आज तेजीत नफा कमविण्याचा अधिकार आहे.
अवेळी खरेदी करून पुढील तेजीची वाट पाहणे इतकेच हातात असते. वैयक्तिक गुंतवणूकदार अजून तेजीत सहभागी झालेले नाहीत, असे विधान इंग्रजी भाषिक माध्यमातून ऐकायला मिळते. ते नेहमी तेजीच्या शेवटच्या टप्प्यात बाजारात प्रवेश करतात. लोकसत्ता अर्थ वृतान्तच्या वाचकांकडून हा प्रमाद टाळावा असे सुचवावेसे वाटते.
आज विश्लेषणासाठी घेतलेल्या कंपनीचा प्रकल्प स्वामी स्वरुपानंदांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पावस इथला, म्हणून आजची सुरुवात स्वामींच्या अभंगाने केली. ज्या काळात २४ तास बातम्यांचे गुऱ्हाळ दळणाऱ्या वाहिन्या नव्हत्या व केवळ रेडिओ हेच ताज्या बातम्या ऐकण्याचे माध्यम होते, त्या काळात घरोघरी सकाळच्या सात वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या हटकून ऐकल्या जात असत. या बातम्या सुरू होण्याआधी ‘फिनोलेक्स’ने आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावाणी’ हे जिंगल अनेकांना स्मरत असेल. या जिंगलची जाहिरातदार असलेली आजची कंपनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड.
देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी फाळणीमुळे स्थलांतरित व्हावे लागलेल्या प्रल्हाद व किशोर छाब्रिया बंधूंनी फिनोलेक्स समूहाची स्थापना केली. पुण्याच्या लक्ष्मी रोडवर पदपथावरचा विक्रेता ते ५००० कोटींची उलाढाल असणारा समूह हा प्रवास अतिशय स्फूर्तिदायक आहे. हा सगळा प्रवास प्रल्हाद छाब्रिया यांनी “There’s No Such Thing as a Self-Made Man” या आत्मचरित्रात वर्णन केले आहे. हे आत्मचरित्र ‘फिनोलेक्स पर्व’ या नावाने मराठीत भाषांतरितही झाले आहे. या फिनोलेक्स समूहाने १९८१ साली फिनोलेक्स पाइप्स लिमिटेड या कंपनीची स्थापना केली.
सुरुवातीच्या काळात ही कंपनी शेतीसाठी जलसिंचनात उपयोगी असणाऱ्या रिजिड पीव्हीसी पाइपचे उत्पादन करीत असे. १९८८ मध्ये कंपनीने रत्नागिरी जिल्ह्य़ात पावस (रानपार) येथे पीव्हीसी रेझिन उत्पादन प्रकल्पास प्रारंभ केला. या प्रकल्पातून उत्पादनास सुरवात झाल्यावर कंपनी केवळ पाइप उत्पादक न राहिल्यामुळे कंपनीने नाव बदलून फिनोलेक्स इंडस्ट्रीज केले. या कंपनीचे मुंबई शेअर बाजारात फिनोलेक्स पाइप्स या
नावाने, तर राष्ट्रीय शेअर बाजारात फिनोलेक्स इंडस्ट्रीज या नावाने व्यवहार होतात.
कंपनीच्या चिंचवड (पुणे), रत्नागिरी येथील कारखान्यांची मिळून वार्षकि क्षमता १,८०,००० टन आहे. कंपनीचा तिसरा कारखाना मासर (बडोदा) येथे यावर्षी १ एप्रिल रोजी सुरू झाला. या कारखान्याची पहिल्या टप्प्यातील उत्पादन क्षमता ३०,००० टन आहे. या कारखान्याचा दुसऱ्या टप्प्यातून उत्पादन २०१५ मध्ये सुरू होणे अपेक्षित आहे. दुसऱ्या टप्प्यातून उत्पादनास सुरुवात झाल्यावर तीनही कारखान्यांची वार्षकि क्षमता मिळून २५,००० टन होईल. कंपनीच्या पावस येथील पीव्हीसी रेझिन वार्षकि क्षमता २,५०,००० टन आहे. कंपनी २० मिमी ते ४०० मिमी व्यासाच्या पाइपचे उत्पादन करते.
कंपनीने इमारतीच्या अंतर्गत पाणीपुरवठय़ासाठी व मलनिस्सारणासाठी वापरावयाच्या पाइपची शृंखला काही वर्षांपासून ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. कंपनीला स्वस्त वीजपुरवठा उपलब्ध व्हावा म्हणून ४३ मेगावॅट क्षमतेचा कोळशावर अधारित वीज निर्मिती प्रकल्प पावस येथे कार्यरत आहे. कंपनी पीव्हीसी पाइपची भारतातील सर्वात मोठी उत्पादक आहे. ३१ मार्च २०१३ संपलेल्या आíथक वर्षांत कंपनीची विक्री २१४५ कोटी होती.
कंपनीने विक्रीत आधीच्या वर्षांपेक्षा २१% वाढ नोंदविली. मागील वर्षी बाराव्या पंचवार्षकि योजनेला प्रारंभ झाला. बाराव्या पंचवार्षकि योजनेच्या अनेक उद्दिष्टांपकी कृषी क्षेत्रासाठी ६५० लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या उद्दिष्टांचा एक भाग म्हणून ५,३०,००० कोटींची तरतूद जलसिंचनासाठी करण्यात आली असून २,३०,००० कोटी जलव्यवस्थापनावर खर्च होणार आहेत.
पाण्याच्या व्यवस्थापनासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. या योजना मुख्यत्वे पाण्याचा अपव्यय टाळून योग्य नियोजनासाठी आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुण्यात मांजरी येथील वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटय़ूट येथे उसासाठी ठिबकसिंचनाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे उद्धृत केले. यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी मोठी तरतूद करण्याचा शासनाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली. पीव्हीसी
पाइपची सर्वात मोठी उत्पादक असलेली व कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश ही मुख्य बाजारपेठ असलेली ही कंपनी अशा अनेक तरतुदींची सर्वात मोठी लाभार्थी आहे. पीव्हीसी रेझिनसाठी लागणारा कच्चा माल हे पेट्रो रसायन असून ते आयात करावे लागते. मागील दोन तिमाहीत रुपयाच्या घसरणीमुळे कच्चा मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली. कंपनीने मागील तिमाहीत या वाढीमुळे आपल्या उत्पादनाच्या किमतीत ८-१५% वाढ केली. मागील तिमाहीत व्याज घसारा करपूर्व नफा क्षमता २२% होती मागील दहा वर्षांतील ही सर्वोच्च नफा क्षमता आहे.
तर कर पश्चात नफा क्षमता ८% असून ही नफा क्षमता मागील तीन वर्षांतील उत्तम नफा क्षमता आहे. मागील वर्षी पडलेल्या अवर्षणामुळे कंपनीच्या उत्पादनाची मागणी घटली होती. या वर्षी मागील वर्षांच्या तुलनेत ३५% अधिक पाणीसाठा जलस्रोतात असल्यामुळे या वर्षी मागणी १२% ने वाढण्याची आशा कंपनीने व्यक्त केली आहे. कंपनीच्या उत्पादनांना एप्रिल-सप्टेंबर या काळात पावसाळ्यामुळे कमी मागणी असते. तर सप्टेंबर-मार्च या काळात अधिक मागणी असते. हवामान खात्याच्या देशातील २० विभागांतील झालेल्या पावसाची सरासरी ८५% आहे. ही सरासरी मागील दहा वर्षांतील उत्तम सरासारीपकी एक आहे. शेतीचे उत्पादन वाढल्यामुळे या वर्षी ग्रामीण भागातून मोठी मागणी संभवते. मागील तिमाहीत कंपनीला रुपयाच्या अती चढउतारामुळे ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले. या तिमाहीत हे नुकसान ५ कोटीपर्यंत कमी असेल.
कंपनीच्या मासार कारखान्यातून उत्पादन सुरू आल्यामुळे पुढील दोन वर्षांत कर्ज ३०%ने तर पाच वर्षांत ८०% ने कमी होण्याचे संकेत कंपनीने दिले आहेत. मागील दोन महिन्यांत १२% ने सुधारलेला रुपया व कंपनीने केलेली भाववाढ लक्षात घेता चालू तिमाहीचा नफा ६२ कोटी असेल, तर वर्षांचा ८५ कोटी असेल. सध्याच्या १४० दरम्यानच्या भावाने शेअर खरेदी केल्यास वार्षकि २५% नफा मिळणे शक्य वाटते. (दुसऱ्या तिमाही निकालांनंतर कंपनी व्यवस्थापनानेविश्लेषक व अर्थसंस्थांना मुंबई येथे केलेल्या सदरीकरणा आधारित) पुण्यात मांजरी येथील वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट येथे उसासाठी ठिबकसिंचनाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी नुकतेच उद्धृत केले. यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी मोठी तरतूद करण्याचा शासनाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली. पीव्हीसी पाईपची सर्वात मोठी उत्पादक असलेली व कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश ही मुख्य बाजारपेठ असलेली ही कंपनी अशा
अनेक तरतुदीची सर्वात मोठी लाभार्थी आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2013 रोजी प्रकाशित
धनधारा..
बाराव्या पंचवार्षकि योजनेला प्रारंभ झाला. बाराव्या पंचवार्षकि योजनेच्या अनेक उद्दिष्टांपकी कृषी क्षेत्रासाठी ६५० लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट
First published on: 11-11-2013 at 09:00 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irrigation and water management