scorecardresearch

घसरण देईल खरेदीची अमोल संधी

निफ्टी निर्देशांकाच्या ५८०० आणि ६००० या पातळ्यांवर ऑप्शन राइटर्सच्या अनुक्रमे पुट्स आणि कॉल ऑप्शन्सचा वाढता भरवसा हा निर्देशांकाचा प्रवास या दोन सीमांपुरता सीमित राहणार असल्याचा दृढ संकेत आता पुरता खरा ठरत असल्याचे दिसत आहे. सरलेल्या आठवडय़ातही निफ्टी निर्देशांकाने किमान ५८२३ तर कमाल ५९१० या पातळ्या दाखविताना, सप्ताहाअखेर ५८४७ वर विश्राम घेतला.

बाजाराचे तालतंत्र

निफ्टी निर्देशांकाच्या ५८०० आणि ६००० या पातळ्यांवर ऑप्शन राइटर्सच्या अनुक्रमे पुट्स आणि कॉल ऑप्शन्सचा वाढता भरवसा हा निर्देशांकाचा प्रवास या दोन सीमांपुरता सीमित राहणार असल्याचा दृढ संकेत आता पुरता खरा ठरत असल्याचे दिसत आहे. सरलेल्या आठवडय़ातही निफ्टी निर्देशांकाने किमान ५८२३ तर कमाल ५९१० या पातळ्या दाखविताना, सप्ताहाअखेर ५८४७ वर विश्राम घेतला.
जागतिक स्तरावर भांडवली बाजार हे अमेरिकेच्या ‘फिस्कल क्लिप’नामक संभाव्य आर्थिक अरिष्टाबाबत नेमका काय निर्णय लागतो याकडे सावधतनेने पाहत आहेत. या संबंधाने ३१ डिसेंबर २०१२ ही अंतिम मुदत जसजशी समीप येत आहे, तसतशी बाजारातील अस्वस्थता वाढू लागली आहे, हे या स्तंभातून आधीही सांगण्यात आले आहे. तथापि सरलेल्या गुरुवारी हे संभाव्य वित्तीय संकट टाळण्यासाठी रिपब्लिकनांकडून आलेल्या प्रस्तावाला पुरेसे सहमतीचे पाठबळ मिळविण्यात आलेल्या अपयशाने चिंतेत आणखीच भर घातली आहे. एका रात्रीत करसवलती काढून घेऊन, क्रयशक्तीवरही बंधने आणण्याच्या या अटळ परिणतीला टाळण्यासाठी वाटाघाटी-सहमतीला आता खूप थोडका वेळ शिल्लक राहिला आहे.  पुन्हा सहमतीच्या नव्या योजनेसाठी डेमॉक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना आता अमेरिकेच्या संसदेत बहुमत असलेल्या रिपब्लिकनांनी निश्चित केलेल्या २७ डिसेंबरची प्रतीक्षा आहे आणि जगभरच्या भांडवल बाजाराचीही त्यावर करडी नजर आहे.
देशांतर्गत अर्थस्थितीकडे वळल्यास लोकसभेने बँकिंग सुधारणा विधेयकाला दिलेल्या मंजुरीनंतर बँका व वित्तीय कंपन्यांच्या समभागांनी मुसंडी मारली. त्यानंतर महत्त्वाची राजकीय घडामोड म्हणजे गुजरात व हिमाचल प्रदेश या राज्यातील निवडणुकांचे निकाल होय. परंतु मोदींचा गुजरातमधील विजय हा आधीच गृहित धरून बाजाराने प्रतिक्रिया स्वरूपात भाव कमावला असल्याने प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी बाजारातील वातावरण थंडच होते. त्यामुळे रिझव्र्ह बँकेचे पतधोरण, निवडणूक निकाल, संसदेचे हिवाळी अधिवेशन वगैरे सर्व देशांतर्गत घटना बाजारावर फारसा परिणाम न साधता पार पडल्या असून, आता केवळ अमेरिकेला आणि पर्यायाने जगाला मंदीच्या खाईत लोटू शकणाऱ्या ‘फिस्कल क्लिप’च्या भवितव्याकडे सर्वाचे डोळे लागले आहेत.
सरलेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकाने मंदीग्रहणता दर्शविली आहे आणि जसा निर्देशांकाने प्रतिकार क्षेत्रात प्रवेश केला, तसा बाजारात विक्रीचा दबावही वाढला असा आपण तांत्रिक आलेखाच्या आधारे या स्तंभातून निष्कर्ष मांडला होता. निर्देशांक आपल्या प्रतिकार क्षेत्रात प्रवेशकर्ता झाला आहे इतकेच नाही तर, शुक्रवारी पुट ऑप्शनकर्त्यांचा ५८०० स्ट्राइक प्राइसवरील भरवसाही ओसरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे याच आठवडय़ात असलेल्या डिसेंबर २०१२ च्या फ्युचर्स अॅण्ड ऑप्शन्स मालिकेच्या सौदापूर्तीपर्यंत निफ्टी निर्देशांक ५८००च्या पातळीलाही छेद देईल आणि पुन्हा आपल्या मूळ आधारपातळी ५७५० कडे झुकेल अशी दाट शक्यता आहे. आमच्या मते ही खरेदीची एक सर्वोत्तम संधी असेल. कारण जानेवारी २०१३ मधील प्रवासाबाबत निश्चितच आशादायी संकेत आहेत. रिझव्र्ह बँकेने जानेवारीमध्ये व्याजदर कपातीचे ठोस संकेत यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे बँका आणि व्याजदर संलग्न क्षेत्रातील समभागांमध्ये खालच्या पातळीवर खरेदीला लगोलग सुरुवात होईल. उल्लेखनीय म्हणजे अमेरिकेतील ‘फिस्कल क्लिप’संबंधी बरा-वाईट निर्णय २७ डिसेंबरलाच सौदापूर्तीच्या दिवशीच परंतु बाजार बंद झाल्यानंतर येईल. त्यामुळे सर्व जळमटे दूर सरल्यानंतर बाजाराला नि:संदिग्धपणे आपला आगामी कल नेमकेपणाने ठरविता येईल.     
सप्ताहासाठी शिफारस
६    रिलायन्स : (सद्य दर ८२४ रु.)     
    विक्री :  लक्ष्य: रु. ८००-७८०
६    हॅवेल्स :  (सद्य दर ६३४.५५ रु.)     
    खरेदी : रु. ६३८ वर; लक्ष्य: रु. ६५४
६    एल अॅण्ड टी : (सद्य दर १५८६ रु.)
    विक्री: लक्ष्य: रु. १५४५
गेल्या आठवडय़ातील खरेदी शिफारशीप्रमाणे स्टेट बँकेने २४०८, टेक महिंद्रने ९६७ आणि येस बँकेने ४७५ अशा उच्चांकांपर्यंत मजल मारली. तर शुक्रवारी ६८९ पर्यंत घसरलेल्या एबीबी चालू आठवडय़ात ६५४ पर्यंत गटांगळी खाऊ शकेल.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Market down but there is a golden chances for buying

ताज्या बातम्या