भारतीय बाजारपेठेत जवळपास गेली ३० वर्षे ‘नीलकमल’ हे नाव प्लॅस्टिक मोल्डेड फर्निचरसाठी परिचित आहे. प्लॅस्टिक फर्निचरमध्ये अग्रेसर असलेल्या या कंपनीची प्रामुख्याने क्रेट्स, कन्टेनर आणि इतरही गरजेनुसार प्लॅस्टिक उत्पादने आहेत.
भारतामध्ये एकूण ७ कारखाने असलेल्या ‘नीलकमल’ने नुकतीच नवीन यंत्रसामुग्री खरेदी करून काही प्रमाणात आधुनिकीकरण केले आहे. काही वर्षांपूर्वी कंपनीने विस्तारीकरण करून @ home या ब्रॅण्डअंतर्गत रिटेलमध्ये पदार्पण केले आहे.
सप्टेंबर २०१२ साठी संपलेल्या सहामाहीचे आर्थिक निकष तितकेसे आकर्षक नसले तरीही कंपनीची नवीन उत्पादने (यात प्रामुख्याने मॅट्रेस, कार्पेट आणि बायो स्टोरेज इत्यादींचा समावेश होतो) आणि किरकोळ साखळी दालने यामुळे कंपनीकडून येत्या वर्षभरात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
तिमाही निकालाची तुलना केल्यास @ home च्या उलाढालीत ४७% वाढ झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षांत, २०१२-१३ मध्ये कंपनीकडून १,६०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
नीलकमल लिमिटेड रु. २५२.५५
मुख्य व्यवसाय : प्लॅस्टिक, होम स्टोअर
मुख्य प्रवर्तक : वामनराय पारेख
भरणा झालेले भागभांडवल : रु. १४.९२ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा : ६२%
दर्शनी मूल्य : रु. १०
पुस्तकी मूल्य : रु. २७१
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) : रु. ३३
किंमत/उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) : ७.६ पट
वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु. २७५/१७७