रिलायन्स म्हटले की डोळ्यासमोर धीरूभाई अंबानीच उभे राहतात. विमलपासून रिलायन्सचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. आज जगातील सर्वात मोठी रिफायनरी जामनगर येथे रिलायन्सचीच आहे. जगातील सर्वात मोठय़ा पहिल्या १० पेट्रोलियम कंपन्यात रिलायन्सची गणना होते. पॉलिस्टर यार्नचे सर्वाधिक उत्पादन रिलायन्सचेच आहे. पेट्रोलियम आणि टेक्सटाईलखेरिज रिटेल, माहिती तंत्रज्ञान आणि विशेष आर्थिक क्षेत्र आदी क्षेत्रातही कंपनी कार्यरत आहे.
सर्वाधिक भागधारक असलेल्या रिलायन्सने आपल्या भागधारकांना कायम खुश ठेवले आहे. मग तो लाभांश असो, हक्क भागविक्री असो किंवा शेअरचा बाजारभाव असो. गेल्या आíथक वर्षांत ३,२९,९०४ कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या कंपनीने यंदाच्या पहिल्या तिमाहीत उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. विक्रीत १०% वाढ नोंदवून ती ९३,८८६ कोटी रुपयांवर गेली आहे. तर नक्त नफ्यात २४% वाढ होऊन तो ५,५०२ कोटी रुपयांवर गेला आहे. रिफायनरी विभागाने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवल्याने आणि या क्षेत्राचे भवितव्य पाहता आगामी काळात कंपनी पेट्रोकेमिकल क्षेत्रात सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून विस्तारीकरण योजना राबवीत आहे.
एकंदरच या प्रचंड मोठय़ा कंपनीची सध्याची कामगिरी चांगली आहे. येत्या आíथक वर्षांत प्रगतीचा हा वेग कायम राहिल्यास कंपनीचे प्रती समभाग उत्पन्न ७५ वर जाईल असा अंदाज आहे. बीटा १ असल्याने रिलायन्सचा शेअर हा निदेशांकाप्रमाणेच कामगिरी करेल. अर्थात पोर्टफोलियोमध्ये रिलायन्स ठेवणे ओघाने आलेच.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
प्रवर्तक                मुकेश अंबानी समूह
सद्य बाजारभाव             रु. ८४५.८५
प्रमुख व्यवसाय             पेट्रोकेमिकल्स, वस्त्रोद्योग इ.
भरणा झालेले भाग भांडवल          रु. ३,२२८.४८ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा              ४५.३४ %
पुस्तकी मूल्य :  रु. ५०३.५५           दर्शनी मूल्य : रु. १०
प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस)        रु. ५६.९०
प्राइस अìनग गुणोत्तर    (पी/ई)        १५.४पट
मार्केट कॅपिटलायझेशन        रु. २,७२,७५९ कोटी
गेल्या वर्षभरातील उच्चांक/ नीचांक     :     रु. ९५४ / रु. ६७१
शेअर होिल्डग पॅटर्न (%)
प्रवर्तक    ४५.३४
परदेशी गुंतवणूकदार    १७.७९       
बँका / म्युच्युअल फंडस्    १०.९०
सामान्यजन  व इतर    २५.९७