पंधरवडय़ापूर्वीचा २६,५०० च्याही खालचा स्तर आणि आता २८ हजारानजीकचा टप्पा.. ‘सेन्सेक्स’ची ही अकस्मात तेजीची उसळी सुरू असतानाच विविध दलाल पेढय़ांनी डिसेंबर २०१५ अखेपर्यंतचे या निर्देशांकाच्या उच्चांकाचे अंदाज खुंटविले आहेत.. अर्थव्यस्थेच्या सुधारणेच्या लाटेवर ३३,००० ची अपेक्षा करणाऱ्या निर्देशांकाला जेमतेम ३१,०००ची मजल गाठता येईल, असे हे ताजे अंदाज आहेत. या पाश्र्वभूमीवर रिलायन्स कॅपिटल अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू व्यापक यांच्याशी झालेल्या बातचीतीत त्यांनी नजीकच्या काळात भांडवली बाजारात मोठय़ा घसरणीची शक्यता वर्तविली आहे.
* भांडवली बाजार तेजीसह रुळावर येऊ पाहत असतानाच, निर्देशांकाच्या उच्चांकाबाबत अंदाजाचे सुधारीत आकडे समोर आले आहेत. बाजारात लवकरच मोठे ‘करेक्शन’ येणार या  तज्ज्ञांच्या तर्क-वितर्कावर तुमची प्रतिक्रिया काय?
– आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत घडामोडींमुळे बाजारातील गुंतवणूकदारांवर चिंतेचे सावट गेल्या कालावधीत पहायला मिळाले. स्थानिक पातळीवर मग ती कर अनिश्चितता असो की जागतिक स्तरावर व्याजाचे दर, इंधनाच्या किंमती याबाबतची असो. गेल्या आठवडय़ातील सेन्सेक्स तसेच निफ्टीचा तेजीचा प्रवास पाहिला तरी बाजारात मोठी घसरण आता येणार नाही, असे ठामपणे म्हणताच येणार नाही.
मुंबई शेअर बाजाराचेच घ्यायचे झाल्यास प्रमुख निर्देशांक त्याच्या तळापासून ३० टक्क्यांपर्यंत वर पोहोचला आहे. तेव्हा बाजारात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे १० ते १५ टक्के ‘करेक्शन’ येण्याची शक्यता आहे. बाजारातील ही स्थिती येत्या काही महिन्यातच उद्भवू शकते..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

* डॉइशे, स्टॅण्डर्ड चार्टर्ड, यूबीएस, एचएसबीसी अशा सर्वच जागतिक संस्थांनी त्यांचे ‘सेन्सेक्स’चे यापूर्वीचे अंदाज नेमके आताच खालावण्याची निश्चित कारण काय असावेत? खरेच की मुंबई निर्देशांक डिसेंबर २०१५ अखेपर्यंत ३१,००० चा टप्पा गाठू शकणार नाही?
– संबंधित संस्थांचा अंदाज-आडाखे हे त्यांच्या अभ्यासावर आधारलेले असतात. तो कमी करण्यासारखी परिस्थिती त्यांनी लक्षात घेतली हे खरे. मात्र वर्षअखेपर्यंत बाजाराचा कल सध्याच्या टप्प्यापेक्षा अधिक राहिल, एवढे निश्चित. बाजारावर मुख्य परिणाम साधणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांसारखा घटक सध्या आश्वस्त होताना दिसत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हकडूनही स्थिर व्याजदराचे संकेत मिळाल्याने त्यांचा उत्साह कायम राहण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Symptoms of global economy through depression
First published on: 29-06-2015 at 01:06 IST