एआयए इंजिनीअिरगची उत्पादने प्रामुख्याने खाणकाम, सिमेंट आणि औष्णिक ऊर्जानिर्मिती या उद्योगांत वापरली जातात. २००३ मध्ये वेगा ही ब्रिटिश कंपनी ताब्यात घेतल्यानंतर गेल्या १० वर्षांत कंपनीने अनेक कंपन्यांचे संपादन आणि विलिनीकरणे केली आहेत. भारताखेरीज कॅनडा, ब्रिटन, अमेरिका आणि आखाती देशांत कार्यरत असणाऱ्या या कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. नुकतेच जाहीर झालेले आíथक निष्कर्ष तितकेसे चांगले वाटत नसले तरीही एसीसी, गुजरात अम्बुजा सिमेंट, िहदुस्थान िझक, बाल्को वगैरे दिग्गज ग्राहक
असणारी ही कंपनी आगामी काळात नि:संशय चांगली कामगिरी करेल. गेल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या नक्त नफ्यात २३% घट होऊन तो ५२.७१ कोटींवर खालावला आहे. सिमेंट आणि खाण उद्योग हे ‘सायक्लिकल’ प्रकारात मोडणारी उद्योगक्षेत्रे असल्याने त्याचा निकालांवर थोडाफार विपरीत परिणाम अपेक्षित होता. येत्या दोन वर्षांत कंपनीची उत्पादन क्षमता २ लाख मेट्रिक टनांवरून ४.४० लाख मेट्रिक टनांवर जाईल. कुठलेही कर्ज नसलेली आणि गेल्या आíथक वर्षांत १,७२० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३०६.३६ कोटी नफा कामावणारी ही कंपनी यंदादेखील उत्तम कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Aug 2014 रोजी प्रकाशित
यांत्रिकी गुणवत्ता
एआयए इंजिनीअिरगची उत्पादने प्रामुख्याने खाणकाम, सिमेंट आणि औष्णिक ऊर्जानिर्मिती या उद्योगांत वापरली जातात.
First published on: 11-08-2014 at 06:33 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Technical potential