सुमारे २६ वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही कंपनी फ्लेक्स इंडस्ट्रीज या नावाने ओळखली जायची. सध्या यूफ्लेक्स ही भारतातील सर्वात मोठी फ्लेक्सीबल पॅकेजिंग क्षेत्रातील कंपनी आहे. भारताखेरीज दुबईत उत्पादन करणाऱ्या या कंपनीची अनेक उत्पादने असून ८० हून अधिक देशांतील बाजारपेठेत ती आपली उत्पादने पुरवते. इंग्लंड, अमेरिका तसेच आखाती देशांत यूफ्लेक्सच्या उप कंपन्या असून अनेक मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपन्या उदाहरणार्थ नेस्ले, पेप्सी, युनिलीवर समूह, हेन्केल, हाइन्झ, स्मिथक्लाइन वगैरे या कंपनीच्या प्रमुख ग्राहक आहेत. या
खेरीज टाटा, गोदरेज, आयटीसी, अशा अनेक भारतीय उद्योग समूहाचाही यात समावेश करावा लागेल. बीओपीईटी फिल्म्स, बीओपीपी फिल्म्स, सीपीपी फिल्म्स, होलोग्राफी, लॅमिनेशन्स इ. अनेक महत्वाची उत्पादने करणारी ही सर्वात मोठी पॅकेजिंग कंपनी आहे. सध्या आíथक परिस्थिती सुधारत असल्याचे संकेत मिळत असल्याने मंदीचे सावट लवकरच दूर होईल. ग्राहकोपयोगी उत्पादनांतील म्हणजे एफएमसीजी कंपन्यांच्या मालाला चांगला उठाव आहेच, त्या खेरीज ऑनलाइन शॉिपगमुळेही पॅकेजिंग कंपन्यांचे दिवस बहरत जातील. ३० सप्टेंबर २०१४ रोजी समाप्त तिमाहीसाठी जाहीर झालेल्या आíथक निष्कर्षांप्रमाणे यंदाच्या तिमाहीत कंपनीच्या उलाढालीत १२% वाढ होऊन ती ८९१.४ कोटी रुपयांवर गेली आहे तर नक्त नफ्यात १२७% वाढ होऊन तो ४५.५ कोटीवर आला आहे. मध्यम ते दीर्घ कालीन गुंतवणुकीसाठी राखून ठेवावा असा हा हाय बीटा शेअर आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2014 रोजी प्रकाशित
हाय बीटा, पण किफायती..
सुमारे २६ वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही कंपनी फ्लेक्स इंडस्ट्रीज या नावाने ओळखली जायची. सध्या यूफ्लेक्स ही भारतातील सर्वात मोठी फ्लेक्सीबल पॅकेजिंग क्षेत्रातील कंपनी आहे.

First published on: 01-12-2014 at 07:26 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uflex ltd