1. मेष : सर्वांना आनंदाने वागवाल. व्यापार्‍यांना चांगला धनलाभ संभवतो. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. स्त्रीसमूहात वावराल. दिवस आळसात जाईल.
  2. वृषभ : कामात वारंवार बदल करू नयेत. सामाजिक वजन वाढेल. काही गोष्टींना पुरेसा वेळ द्यावा. व्यापारीवर्ग खुश राहील. वडिलधार्‍यांना नाराज करू नये.
  3. मिथुन : धार्मिक कामात हातभार लावाल. तुमची लोकप्रियता वाढेल. शैक्षणिक कामे मार्गी लागतील. सामाजिक सेवेची इच्छा दर्शवाल. चांगली कल्पनाशक्ती लाभेल.
  4. कर्क : अचानक धनलाभ संभवतो. कामे कमी श्रमात पार पडतील. काही गोष्टी तडकाफडकी घडतील. जुन्या दुखण्यांकडे लक्ष द्यावे. फार विचार करू नये.
  5. सिंह : कौटुंबिक सौख्य जपावे. जोडीदाराची चांगली साथ राहील. पत्नीच्या प्रेमळपणाची जाणीव होईल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. एकमेकांना समजून घ्याल.
  6. कन्या : क्षुल्लक गोष्टी फार मनावर घेऊ नका. परिस्थितीला नावे ठेवू नका. किरकोळ गोष्टीं नजरेआड कराव्यात. मानसिक चंचलता जाणवेल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे.
  7. तूळ : सर्व बाबी नीट समजून घ्याल. तरलतेने वागाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. स्वच्छंदीपणे वागाल. विचारांना योग्य दिशा द्याल.
  8. वृश्चिक : उत्तम वाहन सौख्य लाभेल. महिलांना कर्तेपणाचा मान मिळेल. घराची स्वच्छता काढली जाईल. उत्तम गृहसौख्य लाभेल. दिवस मजेत घालवाल.
  9. धनू : भावंडांशी सलोखा वाढेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल. नवनवीन गोष्टी जाणून घ्याल. हातातील कलेत वेळ व्यतीत कराल. आवडते वाद्य वाजवाल.
  10. मकर : गायन कलेचे कौतुक केले जाईल. व्यापारी वर्ग खुश राहील. उत्तम व्यावसायीक लाभ संभवतो. आवडीचे पदार्थ चाखाल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल.
  11. कुंभ : सर्वांना आपलेसे कराल. वागण्यातून सज्जनपणा दर्शवाल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. दिवस आनंदात जाईल. कला जोपासायला वेळ काढाल.
  12. मीन : मानसिक चंचलता जाणवेल. चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. उघडपणे बोलणे टाळाल. विचारात वाहून जाऊ नका. अधिकार्‍यांची गाठ घ्याल.

— ज्योतिषी विद्याधर करंदीकर