1. मेष:- मानसिक चंचलता जाणवेल. विचारांच्या गर्दीत वाहून जाऊ नका. भावंडांची मदत घेता येईल. जवळच्या ठिकाणी फेरफटका मारून यावा. आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.
  2. वृषभ:- तुमच्यातील खळखळता उत्साह जागृत ठेवावा. कामाचा ताण जाणवेल. वेळेचे नियोजन केल्यास बर्‍याच गोष्टी जमून येतील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.
  3. मिथुन:- आपल्याचा शब्दावर ठाम राहाल. दिवस मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. क्षणिक गोष्टींनी खुश व्हाल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे. थोडा स्वत:साठी वेळ काढावा.
  4. कर्क:- मागील गोष्टींची पुनरावृत्ती टाळावी. जोडीदाराच्या वागण्याचे आश्चर्य वाटू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल. भावनेच्या अति आहारी जाऊ नका. वैचारिक गोंधळ उडू शकतो.
  5. सिंह:- नोकरदारांचा मान वाढेल. नवीन स्नेहसंबंध जुळून येतील. जवळच्या लोकांची गाठ पडेल. लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.
  6. कन्या:- दिवसभर कामाची गडबड राहील. आपली मनस्थिती गोंधळलेली राहू शकते. कामाचे व्यवस्थित मूल्यमापन करावे. एकाच वेळी अनेक कामात हात घालू नये. इतरांना स्वखुशीने मदत कराल.
  7. तूळ:- चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. नसत्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. फक्त आपल्याच कामाशी मतलब ठेवून वागावे. कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.
  8. वृश्चिक:- आपण स्वत:च आपल्या त्रासाला कारणीभूत ठरू शकाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. भावंडांना मदत करता येईल. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक करतांना संपूर्ण विचार करावा.
  9. धनू:- तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. सारासार विचार करूनच मग कृती करावी. हातापायांच्या किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही साहस करतांना घाई करू नका. प्रवासात खबरदारी घ्यावी.
  10. मकर:- प्रेमातील जवळीक जोपासावी. मुलांशी किरकोळ कारणावरून वाद संभवतात. स्वत:च्या करमणुकीचा मार्ग शोधावा. जुन्या गोष्टींमध्ये फार काळ रेंगाळू नका. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावा
  11. कुंभ:- मुलांच्या चंचलतेकडे बारीक लक्ष ठेवावे. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. आततायीपणे कोणतेही काम करू नये. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. कामाचा ताण वाढू शकतो.
  12. मीन:- घरगुती कामात अधिक वेळ जाईल. मित्रमंडळींमध्ये खोडकरपणा कराल. दिवस मजेत घालवाल. हातातील अधिकाराचा वापर करावा. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा.

      – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily astrology horoscope saturday 15 may msr
First published on: 15-05-2021 at 01:00 IST