मेष

कुलस्वामिनीच्या मंदिरात पांढरी फुले, गजरा अर्पण करावी. सावधपणे निर्णय घ्यावेत. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल करीत असताना विचार्रविनिमय करून निर्णय घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक जपून करावी.
आजचा रंग –जांभळा

वृषभ

लक्ष्मी अष्टकांचे पाठ करावेत. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. व्यवसायामध्ये उत्तम आर्थिक उलाढाल राहील. उत्तम निर्णय क्षमतेचा दिवस. कमोडिटी मार्केट, शेअर्स मधील गुंतवणूकदारांना अनुकूल ग्रहमान आहेत. नवीन योजना राबविता येतील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग –पांढरा

मिथुन

ग्रामदैवतेला धान्य आणि फुले अर्पण करावी. अधिकार संपन्नता येईल. शेती, बांधकाम व्यवसायिक , कम्युडिटी मार्केट, शेअर्स, इंटेरिअर डेकोरेटर यांच्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींबरोबर वेळ आनंदात जाईल. प्रवासाचे योग संभवतात. सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहेत.
आजचा रंग –सोनेरी

कर्क

लक्ष्मी अष्टक सकाळी आणि संध्याकाळी म्हणावे. भाग्यकारक ग्रहमान आहेत. नोकरी, व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. महत्त्वाचे बदल घडविण्यासाठी सर्वांची साथ मिळेल. निर्णय क्षमता वाढेल. परदेशाशी निगडीत प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –निळा

सिंह

कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि उपवास करावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. दूरचे, दगदगीचे प्रवास टाळावेत. उष्णता आणि वातविकार असलेल्यांनी विशेष दक्षता घ्यावी. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. महत्त्वपूर्ण निर्णय योग्य ठरतील.
आजचा रंग -जांभळा

कन्या

ॐ श्री नमः या मंत्राचा जप करावा. व्यावसायिक सहकार्य प्राप्त होईल. व्यवसायामध्ये नवीन गोष्टी करता येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. पतीपत्नींमधील दुरावा कमी होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –नारंगी

तुळ

कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आर्थिक आवक उत्तम राहील. गुंतवणूक करीत असताना सावध राहावे. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सावध राहावे. सामाजिक क्षेत्र, कलेशी निगडीत क्षेत्रामध्ये असलेल्या मंडळींनी सावधपणे दिनक्रम करावा. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग -जांभळा

वृश्चिक

कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. धाडसी निर्णयांचा पाठपुरावा करावा. अनेकांचे सहकार्य लाभेल. संतती सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –पांढरा

धनु

गणपती अथर्व शीर्षाचे पाठ करावे. भागीदारी व्यवसायासाठी उत्तम ग्रहमान आहेत. कौटुंबिक सौख्याचा दिवस. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना सावध राहावे. बांधकामाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –आकाशी

मकर

गणपती मंदिरात हिरवे धान्य अर्पण करावे. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग –मोरपंखी

कुंभ

गणपती मंदिरामध्ये लाल, तांबडी फुले अर्पण करावे. आर्थिक निर्णय योग्य ठरतील. नवीन गुंतवणूकीस अनुकूल ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल करता येतील. कमोडिटी, शेअर्स, शेती, स्टेशनरी, कापड व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक आवक उत्तम राहील.
आजचा रंग-पांढरा

मीन

कुलस्वामिनीच्या दर्शनाने दिवसाची सुरूवात करावी. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. भाग्यकारक घटनांचा दिवस. अनेकांचे सहकार्य लाभेल. कारखानदारांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होईल.
आजचा रंग –पोपटी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu