मेष
लक्ष्मी अष्टक पठण करावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रवासाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ आहे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कोर्ट, कचेरीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. कुटुंबासमवेत उत्तम वेळ घालवू शकाल.
आजचा रंग- लाल

वृषभ
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यवसायात धाडसी निर्णय नको. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. वाहनांशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग- आकाशी

24th April Panchang Marathi Horoscop
२४ एप्रिल पंचांग: उत्तम आर्थिक लाभ ते कौटुंबिक सौख्य, आज १२ पैकी ‘या’ राशींचे नशीब उजळवणारा माता लक्ष्मी
21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
Surya Grahan 12 Rashi Horoscope Today
८ एप्रिल पंचांग: सूर्यग्रहणाला तुमच्या राशीच्या कुंडलीत आनंद की निराशा, १२ राशींना वर्षाचा शेवटचा दिवस कसा जाईल?
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?

मिथुन
कालभैरव अष्टकाचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. पती, पत्नीमधील दुरावा कमी होईल. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे.
आजचा रंग- तपकिरी

कर्क
ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पचनाचे विकार संभवतात. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. वाहाने जपून चालवावीत. गुंतवणूक सावधपणे करावी.
आजचा रंग- पांढरा

सिंह
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. आनंदी ग्रहमान राहील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – हिरवा

कन्या
कालभैरव अष्टकाचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहेत. कौटुंबिक सौख्य लाभेल. राहत्या घराशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. बांधकाम व्यवसायिका आणि शेतीशी निगडीत व्यवसायिकांना अनुकूल ग्रहमान राहिल. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. कुटुंबासमवेत प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – पांढरा

तुळ
ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. वादविवाद टाळावेत. व्यवसायामध्ये मोठे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कम्युडिटी, मार्केट आणि शेअर्समध्ये सावधपणे गुंतवणूक करावी.
आजचा रंग- हिरवा

वृश्चिक
कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना, नोकरदार मंडळींना आजचा दिवस आनंदी राहील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. कम्युडिटी, शेअर्स, शेतीशी निगडीत व्यावसायांना लाभदायक ग्रहमान आहे.
आजचा रंग – निळा

धनु
ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आर्थिक दृष्टीने लाभदायक स्थिती आहे. व्यवसायाशी निगडीत उत्तम स्थिती आहे. प्रवासाचे योग संभवतात
आजचा रंग- पांढरा

मकर
कालभैरव अष्टकाचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे . महत्त्वाचे निर्णय सावधपणे घ्यावेत. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना दक्षता घ्यावी. दगदगीच्या प्रवासाचे योग संभवतात. शेती आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत मंडळींनी दक्षता बाळगावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – लाल

कुंभ
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे . सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. आर्थिक दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज प्रकरणे आर्थिक येणी वसूल करणे यासाठी पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये आर्थिक आवक चांगली राहिल. नोकरदार मंडळींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
आजचा रंग- आकाशी

मीन
लक्ष्मी अष्टक पठण करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू शकाल. कौटुंबिक अडी- अडचणी सोडवू शकाल. कायदेशीर गोष्टींमध्ये यश संभवते.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu