05 August 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २५ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  दिवस मनाजोगा व्यतीत कराल. मैत्रीचे संबंध दृढ होतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. छंद जोपासायला वेगळा वेळ काढाल. ज्ञानाचा योग्य ठिकाणी वापर कराल.
 • वृषभ:-
  कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. दिवस आनंददायी जाईल. मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्यावे. जवळचे नातेवाईक भेटतील. मित्रांचा गोतावळा जमवाल.
 • मिथुन:-
  जवळचा प्रवास सुखाचा होईल. कामात भावंडांचा हातभार लाभेल. तुमच्यातील कलेला प्रसिद्धी मिळेल. लिखाणाचे कौतुक केले जाईल. स्वावलंबनाला महत्व द्याल.
 • कर्क:-
  स्वत:पुरता विचार करू नका. आपल्या कार्यात इतरांना सहभागी करून घ्या. गृहिणींना कर्तेपणाचा मान मिळेल. खाण्या-पिण्याची आवड दर्शवाल. स्वार्थ बाजूला सारावा.
 • सिंह:-
  मानसिक व्यग्रता जाणवेल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. तुमच्यातील ठामपणा सोडू नका. नसत्या काळज्या करू नयेत. काही कामात अडकून पडाल.
 • कन्या:-
  बाहेरील पदार्थ खाऊ नका. पित्ताचा त्रास वाढू शकतो. व्यावसायिक लाभावर लक्ष ठेवा. कौटुंबिक जबाबदारी अंगावर येऊन पडेल. उगाच चीड-चीड करू नये.
 • तूळ:-
  कामाचा वेग वाढेल. दिवसभर कामाची व्यग्रता जाणवेल. सामाजिक वादात पडू नका. अधिकारी व्यक्तींच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्री-वर्गाचा हातभार लाभेल.
 • वृश्चिक:-
  कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. सामाजिक दर्जा सुधारेल. हातातील कामात यश येईल. तुमचा अंदाज अचूक ठरेल. उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करावा.
 • धनु:-
  योग्य संधीसाठी वाट पहावी. नि:स्वार्थीपणे मदत कराल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. वडिलांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. कर्तृत्वाला वाव देण्याचा प्रयत्न करावा.
 • मकर:-
  काही कामे विनासायास पार पडतील. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. सरकारी कामात अडकून पडाल. मनातील इच्छा पूर्ण कराल. विचारांची दिशा बदलून पहावी.
 • कुंभ:-
  जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. भागीदारीतील व्यवहाराकडे लक्ष घालाल. पराभवाला घाबरू नका. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करा.
 • मीन:-
  जोडीदाराची बाजू ऐकून घ्यावी. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. पोटाची काळजी घ्यावी. हाताखालच्या कामगारांची उत्तम साथ मिळेल. नातेवाईकांच्या भेटीने संतुष्ट व्हाल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 25 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २४ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, २३ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २२ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X