28 November 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, २३ नोव्हेंबर २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

मेष:-आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ देऊ नका. पूर्ण खात्री केल्याशिवाय पाऊल पुढे टाकू नका. जोडीदाराचे सान्निध्य व सहयोग लाभेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल.

वृषभ:-तब्येतीची तक्रार कमी होईल. अचानक धनलाभ संभवतो. दिवस शांततेत व्यतीत होईल. प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. मुलांकडून दिलासा मिळू शकेल.

मिथुन:-नातेवाईकांमध्ये टोकाची भूमिका घेऊ नका. व्यवसायात आपले कर्तृत्व दिसून येईल. आपल्या मौल्यवान वस्तु जपून ठेवा. मुलांच्या यशाने खुश व्हाल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.

कर्क:-व्यावसायिक गोष्टी काळजीपूर्वक करा. जोडीदारासमोर आपले विचार स्पष्टपणे मांडा. दिवस मध्यम फलदायी असेल. आपल्याच विचारात गर्क राहाल. प्रिय व्यक्तीची भेट घेता येईल.

सिंह:-कामाचा व्याप वाढता राहील. सामाजिक संबंध जपले जातील. दिवसभरात काहीनाकाही लाभ मिळतील. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. विरोधक पराभूत होतील.

कन्या:-जोडीदाराशी सामंजस्याने वागावे. काही तडजोडी कराव्या लागतील. कामात सहकारी मदत करतील. समाधान मिळवू शकाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

तूळ:-आपल्याच मर्जीत दिवस घालवाल. सर्वांना गोडीने आपलेसे कराल. खर्च काही प्रमाणात वाढलेला राहील. स्व‍च्छंदीपणे सर्व गोष्टींकडे पहाल. मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल.

वृश्चिक:-काही कामे अडकून राहू शकतात. कामाच्या ताणाने निराश होऊ नका. आपली चिकाटी कायम ठेवा. लपवाछपवीचा मार्ग धरू नका. अपेक्षित उत्तराने खुश व्हाल.

धनू:-घरातील व्यक्तींचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. झोपेची तक्रार जाणवेल. कौटुंबिक बाबी शांतपणे हाताळा. जवळचा प्रवास कराल. आवडत्या वस्तु खरेदी करता येतील.

मकर:-जोडीदाराच्या मताचा आदर करावा. समाजात मान वाढेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. जिद्द व चिकाटी कायम ठेवावी. भावंडांशी मतभेद संभवतात.

कुंभ:-दिवस आपल्या मनाजोगा घालवाल. कामातील प्रयत्न फळाला येतील. सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. आपले मत विचारात घेतले जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात वाद टाळावेत.

मीन:-उतावीळपणा करून चालणार नाही. फार विचार करत बसू नका. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. प्रवासात काळजी घ्यावी. मोठ्या व्यक्तींचे सान्निध्य लाभेल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 12:07 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday 23 november 2020 scj 81
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, २२ नोव्हेंबर २०२०
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, २१ नोव्हेंबर २०२०
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२०
Just Now!
X