10 April 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, १५ फेब्रुवारी २०२०

सर्व बारा राशींचे भविष्य

 1. मेष:-
  अधिकारी लोकांची गाठ पडेल. ओळखीचा फायदा करून घेता येईल. गप्पिष्ट लोकांचा सहवास लाभेल. नवीन मित्र जोडता येतील. व्यावसायिक लाभाकडे लक्ष ठेवा.
 2. वृषभ:-
  कामात खंड पडू देऊ नका. तुमच्या व्यक्तिमत्वाचा दबदबा राहील. मनात नवीन आकांक्षा रूजतील. गैरसमजाला खतपाणी घालू नका. कामातून समाधान शोधावे.
 3. मिथुन:-
  कलेसाठी लागणारे साहित्य खरेदी कराल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. करमणुकीचे कार्यक्रम पहाल.
 4. कर्क:-
  घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. शांत व संयमी विचार कराल. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्यावी. भावंडांची काळजी लागून राहील. धार्मिकतेत चांगली वाढ होईल.
 5. सिंह:-
  प्रवासाचा आनंद घ्याल. मित्र मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. अचानक धनलाभ संभवतो. कमी श्रमात कामे करण्यावर भर द्याल. भागिदारीतून चांगला लाभ होईल.
 6. कन्या:-
  गोष्टी मनाजोग्या जुळवून आणाल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे. कर्तव्यात कसूर करून चालणार नाही. मोकळ्या वातावरणात रमून जाल. चटपटीत पदार्थ खाल.
 7. तुळ:-
  सर्वांशी खिलाडूवृत्तीने वागाल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. प्रवासात सतर्कता बाळगावी. गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन वागावे. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल.
 8. वृश्चिक:-
  पराक्रमाला चांगला वाव मिळेल. हातातील कामे आधी पूर्णत्वास न्यावीत. खाण्या-पिण्याची पथ्ये पळावीत. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. आत्मिक समाधान शोधावे.
 9. धनु:-
  स्पष्ट, पण खरे बोलाल. घरगुती कार्यक्रम काढले जातील. जुनी येणी वसूल होतील. घरातील स्वच्छता आवडीने कराल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.
 10. मकर:-
  कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. हस्तकलेसाठी वेळ काढावा. नियमांचे उल्लंघन करू नका. कोर्ट-कचेरीच्या कामात त्रास संभवतो. डोळ्यांची वेळेवर काळजी घ्यावी.
 11. कुंभ:-
  वाढत्या कामामुळे थकवा जाणवेल. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. कामाची घडी नीट बसवावी. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. काही खर्च आकस्मिक होऊ शकतात.
 12. मीन:-
  आवडीनुसार कपडे-लत्ते खरेदी कराल. जवळच्या सहलीचे आयोजन कराल. प्रेमाची दृष्टीने चांगली मैत्री लाभेल. प्रत्येक गोष्टींचा उत्तम रीतीने लाभ घ्याल. आकर्षणाला बळी पडू नका.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 15 february 2020 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२०
2 आजचे राशीभविष्य, गुरुवार, १३ फेब्रुवारी २०२०
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, १२ फेब्रुवारी २०२०
Just Now!
X