मेष

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. प्रकृतीची काळजी घेणे, आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करणे, ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. घरातील वडिलधाऱ्यांसोबत वेळ घालवाल. आदित्याय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वाच्या कामांसाठी गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. कुटुंबासमवेत वेळ घालावा. गुरू मंत्राच जप करावा.
आजचा रंग – राखाडी

मिथुन

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. प्रकृतीचे काळजी घेणे, आर्थिक नियोजन करू शकाल. संतती विषय योग्य निर्णय घ्याल. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. मोठ्या उलाढाली जपून कराव्यात. मुलांमध्ये वेळ घालवाल. ओम गं ओम या गणपतीच्या एकाक्षरी मंत्राच जप करावा.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. वाहने जपून चालवावीत, कामांत ताण जाणवेल, वाद वाढवू नयेत. उलाढाली जपून कराव्यात, जुने स्नेही भेटतील. ग्रामदैवतांचे दर्शन घेणे, दान करणे.
आजचा रंग – लाल

सिंह

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. आर्थिक निर्णय, नियोजन करावे. कामांत उत्साह जाणवेल, नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताण तणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – लाल

कन्या

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे, आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वादविवाद टाळावेत. आर्थिक कामांचा पाठपुरावा करावा. उलाढाली जपून कराव्यात. कुलदैवतांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग –  गुलाबी

तुळ

आर्थिक नियोजनासाठी, निर्णय घेणासाठी चांगला दिवस आहे. मुलांच्या भविष्यासाठी निर्णय घ्याल. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा, कामाचा तणाव कमी होईल. कुलदैवतांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – क्रीम

वृश्चिक

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. कामांत उत्साह जाणवेल, नवीन व्यावसायिक संधीचा पाठपुरावा करावा. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – निळा

धनु

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. नवीन वाहनांचा योग संभवतो. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होईल. नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

मकर

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे, आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. नवीन संधीचा योजनांचा पाठपुरावा करावा. उलाढाली जपून कराव्यात.
आजचा रंग – नारंगी

कुंभ

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व कामांसाठी उत्तम दिवस, आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल. व्यवसायात वाढ होईल. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा, ताणतणाव कमी होतील. प्रवासाचे योग आहेत. महादेवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – तपकिरी

मीन

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक बाजू भक्कम करणारा दिवस. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जुनी येणी वसूल होतील. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप दिवसभरात तिन्ही प्रहर करावा.
आजचा रंग – आकाशी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu